मॅटर्निटी लीव्ह वाढवून 6 महिने केल्यामुळे महिलांची नोकरी धोक्यात - सर्वे

मॅटर्निटी लीव्ह वाढवून 6 महिने केल्यामुळे महिलांची नोकरी धोक्यात - सर्वे

भारत सरकारने महिलांच्या सोयीसाठी बनवलेला कायदा आता त्यांना नुकसान देणारा ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जून : भारत सरकारने महिलांच्या सोयीसाठी बनवलेला कायदा आता त्यांना नुकसान देणारा ठरत आहे. कायद्यांमध्ये बदल करत सरकारने महिलांच्या पेड मॅटर्निटी लीव्ह या 6 महिन्यापर्यंत केल्या. पण एका नव्या सर्वेक्षणानुसार महिलांना या नियमाचा फायदा नाहीतर तोटा होताना दिसत आहे.

या कायद्याअंतर्गत महिलांना कामावर ठेवण्यामध्ये कॅनडा आणि नॉर्वे हे प्रगतशील देश आहे. आणि यानंतर भारताचा नंबर लागतो.

टीमलीज सर्विसेसनं केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली की, मॅटर्निटी लीव्ह वाढवण्याच्या नियमामुळे स्टार्टअप्स आणि छोट्या व्यवसायांमध्ये महिलांना काम करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यांच्या कामात अंतर पडल्यामुळे त्यांना पुन्हा नोकरीसाठी अडचणी येतात.

हेही वाचा...

मुंबईकरांनो सावधान, मुंबईत लेप्टोस्पायरोसिसची लागण, दोघांचा मृत्यू

ही आहेत लेप्टोस्पायरोसिसची कारणं आणि लक्षणं !

या नियमामुळे आर्थिक वर्ष मार्च 2019 पर्यंत 10 सेक्टर्समध्ये 18 लाख पैकी फक्त 11 लाख महिलांना नोकरी दिली जाऊ शकते.

फक्त 11 लाख महिलांना नोकरी मिळणं हा आकडा भारतासाठी निराशाजनक आहे.

भारतात आधीच फक्त 24 टक्के महिला या नोकरदार आहेत. पण आता या निर्णयामुळे यात आणखी घट होईल. त्यामुळे मॅटर्निटी लीव्ह आता महिलांना महागात पडणार असंच म्हणायला लागेल.

हेही वाचा...

खासदारकीचा राजीनामा देईन पण नाणारची वीट रचू देणार नाही - नारायण राणे

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवली, मुसळधार पावसाचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 10:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading