रेपो दरात कपात करण्याव्यतिरिक्त RBI च्या 5 महत्त्वाच्या घोषणा

रेपो दरात कपात करण्याव्यतिरिक्त RBI च्या 5 महत्त्वाच्या घोषणा

आरबीआयकडून व्याजदरामध्ये एवढी मोठी कपात जवळपास एका दशकानंतर करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2008 आणि जानेवारी 2009 मध्ये रेपो रेट 100 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 1 टक्क्याने कमी करण्यात आला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : कोरोनाच्या संकटकाळात आरबीआयकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑफ इंडियाने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 75 bps (Basis Points) ची कपात करण्यात आली आहे आणि 4.40 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांचे हफ्ते भरताना मोठा दिलासा मिळणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी ही माहिती दिली.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये बँकाची काम सुरूच,महत्त्वाचं काम असेल तर जाणून घ्या बदललेल्या वेळा)

त्याचप्रमाणे आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्ये 90 bps ची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे हा दर आता 4 टक्क्यांवर पोहोचला आहे. COVID-19 मुळे संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे.

एका दशकानंतर सगळ्यात मोठी कपात

आरबीआयकडून व्याजदरामध्ये एवढी मोठी कपात जवळपास एका दशकानंतर करण्यात येत आहे. ऑक्टोबर 2008 आणि जानेवारी 2009 मध्ये रेपो रेट 100 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 1 टक्क्याने कमी करण्यात आला होता. तर आता मार्च 2020 मध्ये रेपो रेट 75 बेसिस पॉईंट्सने कमी केला आहे.

 रेपो रेटबाबतच्या निर्णयाव्यतिरिक्त RBI ने घेतलेले महत्त्वाचे निर्णय

-CRR मध्ये एका टक्क्याने कपात : RBI ने सर्व बँकांसाठी अनिवार्य असणार कॅश रिव्हर्स रेशो (CRR) 4 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे. 28 मार्चपासून एका वर्षासाठी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. CRR मध्ये 100 BPS कपात झाल्यामुळे बाजारात 1.37 लाख कोटी रुपये येतील

-नवीन सिस्टिमध्ये 3.74 लाख कोटी येणार : आरबीआय गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार या निर्णयांमुळे एकंदरित व्यवस्थेमध्ये 3.74 लाख कोटी रुपये येणार आहे. आरबीआय पॉलिसी व्याजदराशी संबधित फ्लोटिंग दरावर 1 लाख कोटी रुपयांपर्यंत तीन वर्षासाठी लॉन्ग टर्म रेपो ऑपरेशन (LTRO) चा लिलाव आयोजित करेल. लॉन्ग टर्म रेपो ऑपरेशन अशी टूल आहे, ज्याअंतर्गत रिझर्व्ह बँक चालू रेपो रेटवर बँकांना 1 ते 3 वर्षासाठी निधी देते. याच्या बदल्यात बँका समान व्याजदरावर कोलॅटरल म्हणून सरकारी सिक्युरिटीजची खरेदी करतात.

-टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम : आरबीआयने मोठा निर्णय घेत सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे. डिफॉल्ट स्थितीमध्ये कर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासली जाणार नाही.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये SBI चे 90 टक्के एटीएम सुरू, वाचा पैसे काढताना कोणती खबरदारी घ्याल)

-नेट फंडिंग रेशोचे नियम : 6 महिन्यांसाठी हे नियम शिथील करण्यात आले आहेत. गेल्या MPC पासून सिस्टिममध्ये 2.8 लाख कोटी रुपये आहेत. बँकिंग व्यवस्था सुरक्षित आणि मजबूत आहे. बँकेच्य़ा ग्राहकांना चिंतेचं काही कारण नाही आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्याबाबत आरबीआयकडून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

-बँकेत सर्व भारतीयांचे पैसे सुरक्षित : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, बँकेमध्ये सर्व भारतीयांचे पैसे सुरक्षित आहेत. बँकिंग व्यवस्था सुरक्षित आणि मजबूत आहे.

First published: March 27, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या