• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Rishi Kapoor Passes Away: अवघ्या 22 तासांत एकाच आजारामुळं बॉलिवूडनं गमावले दोन चमकते तारे

Rishi Kapoor Passes Away: अवघ्या 22 तासांत एकाच आजारामुळं बॉलिवूडनं गमावले दोन चमकते तारे

Rishi Kapoor Death News: अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनामुळं एक मोठी पोकळी जणू सिनेसृष्टीत निर्माण झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडसाठी गेले 24 तास फार वेदनादायी ठरले. बुधवारी (29 एप्रिल) रोजी अभिनेता इरफान खान (Irrfan khan) तर आज सकाळी दिग्गज अभिनेता ऋषी कपूर (rishi kapoor) यांचे निधन झाले. या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या मृत्यूनंतर एक मोठी पोकळी जणू निर्माण झाली आहे. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यात एक साम्य होते ते म्हणजे कॅन्सर. या एका रोगानं 22 तासांच्या आज बॉलिवूडच्या दोन दिग्गजांना गमावलं. 2018मध्ये ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यांचा भाऊ रणधीर कपूर यांनी याबाबत माहिती दिली होती. यासाठी ते अमेरिकेत उपचारासाठी गेले होते. तेथे त्यांच्यावर 11 महिने 11 दिवस उपचार सुरू होते. यानंतर जेव्हा ते मुंबईला परत आले तेव्हा चाहत्यांचे जोरदार स्वागत झाले. नेहमीच मजेशीर आणि रोखठोक ट्वीटमुळे ओळखले जाणारे ऋषी कपूर यांनी 2 एप्रिल रोजी शेवटचे ट्वीट केले होते. वाचा-बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन अमेरिकेत घेतले होते उपचार दरम्यान, अमेरिकेतून परतल्यानंतरही ऋषी कपूर पूर्णपणे बरे झाले नव्हते. त्यांच्यावर मुंबईतही सुरू होते. श्वासोच्छावासाचा त्रास होत असल्यामुळं त्यांना बुधवारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. आज सकाळी 8:45 वाजता ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.ऋषी कपूर यांनी दोन वर्ष ल्यूकेमिया या आजाराविरुद्ध लढा दिला होता. वाचा-'मकबूल'ला शेवटचा निरोप, लॉकडाऊनमुळे मोजका मित्रपरिवार उपस्थित इरफानचेही कॅन्समुळं झाले निधन याआधी बुधवारी इरफान खान या अभिनेत्यानं निधन झालं. इरफान खान यांना कोलन इन्फेक्शन (Colon Infection) होतं. 54 वर्षीय इरफान यांनाही 2018मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. कॅन्सरशी दोन हात केल्यानंतर इरफान भारतात परतले. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. इरफान खानच्या मृत्यूनंतर चाहते सावरत असतानाच त्यांना सगळ्यात मोठा झटका बसला. ऋषी कपूर यांनी 1970 सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 1973 साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांची ओळख कायम बॉलिवूडमधला चार्मिंग हिरो म्हणून राहिल. वाचा-शेवटच्या श्वासापर्यंत तिनं दिली साथ..., ऋषी कपूर यांची न ऐकलेली गोष्ट संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: