पुण्यातून आली धक्कादायक आकडेवारी, रात्र ठरली धोकादायक!

पुण्यातून आली धक्कादायक आकडेवारी, रात्र ठरली धोकादायक!

पुण्यात एकाच रात्री तब्बल 127 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

  • Share this:

पुणे, 30 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात कोरोनाबाधितांची गेल्या 24 तासातली धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात एकाच रात्री तब्बल 127 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1722 वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री पुण्यात  87 रुग्ण आढळले होते. त्यानंतर यात  मध्यरात्री आणखी 40 रुग्णांची भर पडली. अशा एकूण 127 नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. पुण्यात आतापर्यंत 86 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बरचे रुग्ण हे झोपडपट्टीत राहणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.

पुण्यातील ऑरेंज झोनची संख्या वाढली

पुण्यातील पूर्व परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना काही भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. परिणामी ऑरेंज झोन दोनवरून चार झाले आहेत. यात औंध-बाणेर, कोथरुड-बावधन, वारजे-कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता या क्षेत्रिय कार्यालय परिसराचा समावेश आहे.

हेही वाचा -लॉकडाउनमध्ये दारू विक्री बंद असतानाही गडबड, प्रशासनाने केली मोठी कारवाई

 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 9915 वर

दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोनाबाधित 597 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9915 झाली आहे. राज्यात बुधवारी एकूण 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातले सर्वाधिक 26 मृत्यू मुंबईत झाले आहेत. सध्या राज्यात 1,62,860 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 10,813 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली. आजपर्यंत 1593 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 30, 2020, 11:00 AM IST
Tags: pune

ताज्या बातम्या