मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यातून आली सर्वात मोठी बातमी, जालनेकरांनी करून दाखवलं!

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यातून आली सर्वात मोठी बातमी, जालनेकरांनी करून दाखवलं!

दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह महिलांचा वैद्यकीय अहवाल अखेर निगेटिव्ह आला असून कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये आला आहे.

दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह महिलांचा वैद्यकीय अहवाल अखेर निगेटिव्ह आला असून कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये आला आहे.

दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह महिलांचा वैद्यकीय अहवाल अखेर निगेटिव्ह आला असून कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये आला आहे.

जालना, 26 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे मोठ्या जिकरीने कोरोनाशी लढा देत सरकारी पातळीवर योग्य नियोजन करत आहे. परंतु, राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातून आता सर्वात चांगली बातमी आली आहे. जिल्ह्यातील दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह महिलांचा वैद्यकीय अहवाल अखेर निगेटिव्ह आला असून कोरोनामुक्त झाल्यामुळे आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आता ग्रीन झोनमध्ये आला आहे. शहरातील दुखीनगर भागातील 65 वर्षीय महिला आणि परतूर तालुक्यातील शिरोडा येथील महिला असे या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. गेल्या दीड महिन्यापासून अथक परिश्रम घेत असलेल्या सरकारी यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या अखंड प्रयत्नाचे हे खऱ्या अर्थाने मोठे यश मानले जात आहे. जालना शहरातील दुःखी नगर भागातील एक आणि शिरोडा ता.परतूर येथील एक अशा दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्यावर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून योग्य ते उपचार केले. हेही वाचा - राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार का? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा दुःखी नगर मधील महिलेचा आतापर्यंत तीन वेळा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर देखील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपला सकारात्मक लढा कायम ठेवला. परिणामी शुक्रवारी रात्री उशिरा दुःखी नगर मधील महिलेसह शिरोडा येथील अशा दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या महिलांचे अहवाल प्रयोग शाळेकडून निगेटिव्ह प्राप्त झाले होते. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरम्यान, निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातर्फे या दोन्ही रुग्ण महिलांच्या लाळेचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे  शनिवारी सकाळी तपासणीसाठी पाठवले होते. हेही वाचा - कोरोनाच्या काळात मेक इन इंडिया, गुजरातमध्ये तयार करण्यात आलं स्वदेशी PPE किट प्रयोग शाळेकडून याबाबतचा अहवाल जिल्हा सरकारी रुग्णालयास प्राप्त झाला असून या अहवालात या दोन्ही महिला निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. जिल्ह्यातील अखेरचे दोन्ही कोरोनाबाधित रुग्णांनी आता कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांचा जालना जिल्हा कोरोनामुक्त झाला असून त्याचा आता ग्रीन झोनमध्ये समावेश झाला आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Marathwada, Rajesh tope

पुढील बातम्या