कोरोनाच्या काळात मेक इन इंडिया, गुजरातमध्ये तयार करण्यात आलं स्वदेशी PPE किट

कोरोनाच्या काळात मेक इन इंडिया, गुजरातमध्ये तयार करण्यात आलं स्वदेशी PPE किट

हे किट केंद्र सरकार, गुजरात सरकार आणि भारतीय सैन्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • Share this:

वडोदरा, 26 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 25 हजारपर्यंत पोहोचली आहे. याच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी गुजरातमधील वडोदरामधील एका कंपनीने भारतीय बनावटीचं पीपीई किट तयार केलं आहे. आपल्याकडे असलेल्या पीपीई किटची कमतरता आणि बाहेरून मागवलेले काही किट निकृष्ट दर्जाचे निघाल्यानंतर आता भारतात स्वदेशी PPE किट तयार करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला होता. वडोदराच्या कंपनी शोर सेफ्टी (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार हे किट केंद्र सरकार, गुजरात सरकार आणि भारतीय सैन्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या किटमधील सूट हा पॉझिटिव्ह एअर प्रेशन चालवला जातो. सूटमधील हवेच्या गुणवत्तेचं मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीनं केलं जातं. हे पीपीई सूट डिस्पोजेबल नाही. म्हणजे एकदा वापरा टाकून द्या असे ही सूट नसल्यानं त्याचा कचरा होणार नाही आणि संसर्गाचा धोका होणार नाही. हे किट कोरोनाचा संसर्गापासून 100 टक्के दूर ठेवेल असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे हे किट सुरक्षित आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचा-PM नरेंद्र मोदी कुठला मास्क वापरतात माहित आहे का? कंपनी आणि किंमतही आहे खास

गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत 3071 वर पोहोचली आहे. शनिवारी 256 नवीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 133 जणांचा मृत्यू झाला आहे. सूरतमध्ये मागच्या 24 तासांत 34 तर वडोदरामध्ये 7 नवीन रुग्ण आढळले आहेत.

मागच्या 24 तासांत 1490 नवीन रुग्ण आढळले असून देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 24942वर पोहोचला आहे. जवळपास 25 हजाराच्या आसपास आहे. आतापर्यंत 5210 व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या व्हायरसच्या संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

हे वाचा-ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! पोलिसांची पुणेकरांसाठी एक खुली ऑफर

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 26, 2020, 7:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading