राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार का? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा

राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार का? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा

राज्यात 3 मेपर्यत लॉकडाऊनच्या नियमावलीत कोणताही बदल करण्यात येणार नाही

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी लॉकडाऊनचे निर्बंधांबाबत मोठा खुलासा केला आहे. राज्यात 3 मेपर्यत लॉकडाऊनच्या नियमावलीत कोणतेही बदल करण्यात येणार नाही, अर्थात कोणतेही निर्बंध शिथिल होणार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा... चिंताजनक! आता कोरोना योद्धांचा बळी, मुंबईत पोलिस तर मालेगावात डॉक्टराचा मृत्यू

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात दुकाने उघडण्यासंदर्भात केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात कोणतीही स्पष्टता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याची येत्या सोमवारी व्हिडिओ कॉन्फ्रेरन्स मिटींग होणार आहे. त्यात याबाबत सर्व बाबी स्पष्ट होऊ शकतील. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावरही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लॉकडॉऊनच्या काळात 3 मेपर्यत कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन (India lockdown) कायम ठेवण्यात आला आहे. 3 मे रोजी देशातील काही भागात लॉकडाऊन संपुष्टात आला तरी महाराष्ट्रात 18 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची माहिती सध्या फिरत आहे. मात्र, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा..पुण्यात धोका वाढला! खासगी हॉस्पिटल्स, कॉलेजेस आणि हॉटेल्स सरकार ताब्यात घेणार

राज्यात अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी संचारबंदी शिथिल करण्यात येणार नसल्याचे राजेश टोपे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी पूर्णपणे सीमा बंद करुन काही महत्वाच्या व्यवहारांना परवानगी देण्याची शक्यता असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 25, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या