जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / विद्यार्थ्यांना दिली उत्तरासह प्रश्नपत्रिका, सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार

विद्यार्थ्यांना दिली उत्तरासह प्रश्नपत्रिका, सोलापूर विद्यापीठाचा अजब कारभार

यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका म्हणून देण्यात आली होती की उत्तरपत्रिका म्हणून देण्यात आली होती, हाच खरा सवाल आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका म्हणून देण्यात आली होती की उत्तरपत्रिका म्हणून देण्यात आली होती, हाच खरा सवाल आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका म्हणून देण्यात आली होती की उत्तरपत्रिका म्हणून देण्यात आली होती, हाच खरा सवाल आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्रीतम पंडीत, प्रतिनिधी सोलापूर, 02 ऑगस्ट : सोलापूर विद्यापीठात परीक्षेतील सावळागोंधळ समोर आला आहे. एमए उर्दू भाषेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमएच्या विद्यार्थ्यांना खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका सोपवण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात परीक्षेत धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली.  एम ए उर्दू भाषाची परिक्षा सुरू होती. पण या परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आली.  एम ए या विद्यार्थ्यांना खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका खुणासह देण्यात आलेली प्रश्नपत्रिका news18 लोकमत हाती लागली आहे.   गेली महिन्यापासून सोलापूर विद्यापीठचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरून सावळा गोंधळ सुरू आहे. ( संबित पात्रांनी केली संजय राऊतांची पोलखोल, आकडे देऊन केला मोठा खुलासा ) आज  एम ए उर्दू अधिविभागाच्या तब्बल 20 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्याची माहिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका म्हणून देण्यात आली होती की उत्तरपत्रिका म्हणून देण्यात आली होती, हाच खरा सवाल आहे. ( तुम्ही फक्त हार्ट अटॅकचंच टेन्शन घेताय; तुम्हाला माहिती नसतील असे हृदयाचे आजार ) महत्त्वाचं म्हणजे, गेल्या महिन्यापासून सोलापूर विद्यापीठचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत सावळा गोंधळ सुरूच आहे. दरम्यान न्यूज18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर आता परीक्षा नियंत्रक  गणपूर शिवकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. -

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात