ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! पोलिसांची पुणेकरांसाठी एक खुली ऑफर

ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! पोलिसांची पुणेकरांसाठी एक खुली ऑफर

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण, विनापास मोकाट फिरणाऱ्यांसाठी पुणे पोलिसांनी एक ट्वीट केलं आहे.

  • Share this:

पुणे, 25 एप्रिल: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर विनाकारण, विनापास मोकाट फिरणाऱ्यांना पुणे पोलिसांनी एक खुली ऑफर दिली आहे. 'ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! कोणताही पास नाही, असं एक ट्वीट पुणे पोलिसांनी केलं आहे.

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कठोर केले असताना पुणे पोलिसांच्या ट्वीटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ''तुम्हाला बाहेर जायचंय तर खुशाल जा पण त्यासाठी आमची एकच आहे ती म्हणजे आधी 6 तास कोरोनाचा संसर्ग झालेल्या 'रेड झोन'मध्ये पोलिसांसोबत ड्युटी करून दाखवावी... बोला आहे मंजूर...'' अशा आशयाचं ट्वीट पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

हेही वाचा.. राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार का? राजेश टोपेंनी केला मोठा खुलासा

मध्यंतरी चेन्नई पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्यांना डमी कोरोना रुग्णाची भीती दाखवली होती. तो चेन्नई पोलिसांचा अॅम्ब्युलन्सवाला व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी ही भन्नाट ऑफर भटकणाऱ्यांसमोर ठेवली आहे. यावरुन सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे पुणे पोलिसांचं ट्वीट...

हेही वाचा.. सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, ठाण्यात शिवसेनेच्या खासदाराचा 'प्रताप' तुम्हीही पाहा

पुण्यात धोका वाढला! खासगी हॉस्पिटल्स, कॉलेजेस आणि हॉटेल्स सरकार घेणार ताब्यात

राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर खबरदारी म्हणून गरज पडली तर शहरातली खासगी हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स अधिग्रहित करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश शनिवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी दिली आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश दिले होते. आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली. पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड-19 बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 25, 2020, 11:39 PM IST

ताज्या बातम्या