Home /News /news /

Coronavirus Update: कोरोनाचा गेल्या 24 तासांत पुन्हा हाहाकार, मृतांची संख्याही 4167 वर

Coronavirus Update: कोरोनाचा गेल्या 24 तासांत पुन्हा हाहाकार, मृतांची संख्याही 4167 वर

मंगळवारपर्यंत देशभरात एकूण कोरोनाची प्रकरणे 145,380 वर पोहोचली आहेत.

    नवी दिल्ली, 26 मे : मंगळवारी देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus India) मृत्यूची संख्या 4167 वर पोहोचली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Mohfw Covid Data) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 80722 पर्यंत पोहोचली आहे, तर बरे झालेल्या लोकांची संख्या 60490 वर पोहचली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी 24 तासांत 6,535 प्रकरणे वाढली. त्याचवेळी एका दिवसात 146 लोक मरण पावले. यासह, गेल्या 24 तासांत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 2,770 आहे. मंगळवारपर्यंत देशभरात एकूण कोरोनाची प्रकरणे 145,380 वर पोहोचली आहेत. ज्यामध्ये 111 परदेशी रुग्णांचा आणि 1 रूग्ण परदेशात परतलेल्याचा समावेश आहे. इतर राज्यांविषयी बोलायचं झालं तर, अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 33, आंध्रमध्ये 3110, अरुणाचल प्रदेशात 2, आसाममध्ये 526, बिहारमध्ये 2730, छत्तीसगडमध्ये 238, दादर नगर हवेलीमध्ये 2, दिल्ली 14,053, गोव्यात 67 अशी स्थिती आहे. सरकार अस्थिर झालंय का? पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांचा मोठा खुलासा गुजरातमध्ये 14,460, हरियाणामध्ये 1184, हिमाचल प्रदेशात 223, जम्मू-काश्मीरमध्ये 1668, झारखंडमध्ये 377, कर्नाटकमध्ये 2182, केरळमध्ये 896, मध्य प्रदेशात 6859,, महाराष्ट्रात 52,667, मणिपूरमध्ये 39, मेघालयातील 14, मिझोरममध्ये 1, नागालँड 3, ओडिशामध्ये 1438, पुडुचेरीमध्ये 41, पंजाब 2060, राजस्थान 7300, सिक्कीम 1, तमिलनाडुमध्ये 17082, तेलंगणात 1920, त्रिपुरामध्ये 194, उत्तराखंडमध्ये 349, पश्चिम बंगालमध्ये 3816 प्रकरणांमध्ये नोंद झाली आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार 2970 प्रकरणे पुन्हा राज्यांकडे परत सोपवण्यात आली आहेत. मातोश्रीवर शरद पवारांसोबत झाली गुप्त बैठक, महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या राज्यात अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 33, आंध्रमध्ये 1896, अरुणाचल प्रदेशात 1, आसाममध्ये 62, बिहारमधील 749, चंदीगडमध्ये 186, छत्तीसगडमध्ये 72, दादर नगर हवेलीतील 0 रुग्ण बरे झाल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीत 6771, गोव्यात 19, गुजरातमध्ये 63636, हरियाणामध्ये 765, हिमाचल प्रदेशात 67. महाराष्ट्रमध्ये 15786, जम्मू-काश्मीरमध्ये 809, कर्नाटकात 705, केरळमध्ये 705, लडाखमध्ये, 43, मध्य प्रदेशात 3571, मणिपूरमध्ये 4, मेघालयात 12, मिझोरममध्ये 1, नागालँडमध्ये 0, ओडिशामध्ये 649, पुडुचेरीमध्ये 12, राजस्थानमधील 3951, सिक्किम 0, तेलंगाना 1164, त्रिपुरा 165, उत्तराखंडमध्ये 58, उत्तर प्रदेशमध्ये 3581, पश्चिम बंगालमधील 1414 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात महासंकट, राज्याची तुलना देशाशी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या