...म्हणून प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न मोडलं

...म्हणून प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न मोडलं

प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांनी सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांच्या लग्न मोडण्याच्या बातमीला दुजोरा देत यामागचं खरं कारण सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 6 मे- प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांनी सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांच्या लग्न मोडण्याच्या बातमीला दुजोरा देत यामागचं खरं कारण सांगितलं. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत, डॉ. चोप्रा म्हणाल्या की, सिद्धार्थ लग्नासाठी तयार नव्हता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी त्याला अजून थोडा वेळ हवा होता.

आपल्या स्टेटमेन्टमध्ये डॉ. मधू चोप्रा म्हणाल्या की, ‘माझा मुलगा सिद्धार्थ म्हणाला तो लग्नासाठी तयार नसून मानसिकरित्या त्याला अजून थोडा वेळ हवा आहे.’ वेबसाइटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अरेंज मॅरेज फार लवकर ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर लगेच लग्नाची तारीखही जवळची ठरवण्यात आली.

Sacred Games 2 Teaser: सरताज सिंगचा काटेकर परत येणार का?

गेल्या आठवड्यात दोघांचं लग्न होणार होतं. दरम्यान, इशिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट एक फोटो शेअर करत तिने भूतकाळ विसरून नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं. तसेच इशिताने रोक्याचे सर्व फोटोही इन्स्टाग्रामवरून डिलीट केले. तिच्या आई- वडिलांनीही पोस्टवर कमेंट करून तिला पूर्ण पाठिंबा दिला.

OMG! 'द मेट गाला'साठी दीपिकानं खरेदी केली चक्क एवढ्या लाखांची बॅग

गेल्या गुरुवारी एका रेस्टॉरंटमधील स्वतःचा फोटो शेअर करत इशिताने लिहिले की, ‘भूतकाळाला हसतं अलविदा म्हणत नव्याने सुरुवात करण्यासाठी चिअर्स.’ इशिताच्या आईने निधी कुमार यांनीही या फोटोवर कमेंट करत म्हटलं की, ‘जूनं पुस्तक बंद करून नवीन गोष्ट लिह.’ तर वडिलांनी कमेंट केली की, ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत.’

एकमेकांवर वस्तू फेकून मारायचे अर्जुन आणि मेहर, त्या भांडणानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थचा हा दुसरा साखरपुडा होता. ऑक्टोबर २०१४ मध्ये सिद्धार्थने गर्लफ्रेंड कनिका माथूरशी साखरपुडा केला होता. दोघं २०१५ मध्ये गोव्यात लग्न करणार होते. मात्र काही कारणांमुळए हे लग्न मोडलं होतं. यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रियांका चोप्रा सिद्धार्थ आणि इशिताच्या साखरपुड्यासाठी मुंबईत आली होती. तिच्यासोबत यावेळी नवरा निक जोनसही होता.

या टीव्ही कपलमधले वाद विकोपाला, लवकरच घेणार घटस्फोट?

VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 03:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading