Sacred Games 2 Teaser: सरताज सिंगचा काटेकर परत येणार का?

Sacred Games 2 Teaser: सरताज सिंगचा काटेकर परत येणार का?

गणेश गायतोंडेचा मुख्य साथीदार बंटी अर्थात जतीन सरनाही या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनमध्ये त्याचा मृत्यू दाखवला होता.

  • Share this:

मुंबई, 6 मे- नेटफ्लिक्सची सर्वात लोकप्रिय वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स २' चा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यूट्युबवर शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये दुसऱ्या सीझनची स्टारकास्ट दिसत आहे. पहिल्या सीझनच्या मुख्य व्यक्तिरेखा सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी या सीझनमध्येही आहेतच शिवाय कल्की कोचलिन आणि रणवीर शोरीही या नव्या सीझनमध्ये दिसत आहेत.

यूट्युबवर टीझर शेअर केल्यापासूनच तुफान व्हायरल होत आहे. तरुणाईमध्ये 'सेक्रेड गेम्स'ची तुफान क्रेझ आहे. पहिला सीझन संपल्यानंतरच अनेकांनी दुसरा सीझन लवकरात लवकर यावा अशी मागणी केली होती. आता दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज केल्यामुळे या सीझनची उत्सुकता दुप्पटीने वाढली आहे.

OMG! 'द मेट गाला'साठी दीपिकानं खरेदी केली चक्क एवढ्या लाखांची बॅग

टीझरच्या सुरुवातीला सैफ अली खान दिसतो, त्यानंतर नवाजउद्दीन सिद्दीकी त्यानंतर कल्की कोचलीन मग रणवीर शोरी. जेव्हा रणवीर शोरी मागे वळून पाहतो तेव्हा पंकज त्रिपाठीची एण्ट्री दाखवली आहे. यात पंकजचा लुक फार अतरंगी आणि रहस्यमय दाखवण्यात आला आहे. त्याच्या या लुकमुळेच या नव्या सीझनमध्ये वेगळं काय पाहायला मिळणार याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसत आहे.

करण जोहरच्या मुलांना सांभाळतेय गौरी खान, PHOTO VIRAL

नेटफ्लिक्सने आधीच सांगितलं होतं की, या नवीन सीझनमध्ये कथानक पुढे सरकवण्यासाठी आणि कथेला नवीन वळण देण्यासाठी जुन्या कलाकारांसोबत नवीन कलाकारांचाही सहभाग करण्यात आला आहे. 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीझनमध्ये आकर्षक गुरुजी (पंकज त्रिपाठी) याला गणेश गायतोंडेचा तिसरा बाप या स्वरुपात दाखवण्यात आले होते. त्यामुळे या नव्या सीझनमध्ये पंकजभोवतीच कथानक फिरेल हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.

एकमेकांवर वस्तू फेकून मारायचे अर्जुन आणि मेहर, त्या भांडणानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अनुराग कश्यपने गणेश गायतोंडेचं दिग्दर्शन केलं आहे तर नीरज घायवानने सरताज सिंगच्या भागाचं दिग्दर्शन केलं आहे. पहिल्या सीझनमध्ये राधिका आपटे आणि कुब्रा सेठ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या 'मिर्झापूर' वेबसीरिजची अभिनेत्री हर्षिता गौरने सांगितलं होतं की, 'सेक्रेड गेम्स २' मध्ये तिला एक महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. तर गणेश गायतोंडेचा मुख्य साथीदार बंटी अर्थात जतीन सरनाही या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनमध्ये त्याचा मृत्यू दाखवला होता. त्यामुळेच काटेकरची व्यक्तिरेखा साकारणारा जितेंद्र जोशीही पुन्हा या सीरिजमध्ये दिसणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. अनेकांनी कमेंटमध्ये काटेकरला परत आणि अशी मागणीही केली आहे.

फक्त काही तासांसाठी तब्बल एवढ्या कोटींचे कपडे घालून निघाली प्रियांका चोप्रा

First published: May 6, 2019, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading