मुंबई, 5 मे- गेल्या दोन वर्षांपासून टीव्ही जगतातील एका जोडप्याचा संसार मोडण्याच्या वाटेवर आहे. असं म्हटलं जातं की २०१६ मध्येच या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पण अजूनपर्यंत दोघांनी घटस्फोट घेतलेला नाही. कॅमेऱ्यासमोर नेहमीच सर्वोत्कृष्ट कपल असणाऱ्या पोझ देणारे सेलिब्रिटी जेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांचे चाहते दुखावले जातात. आम्ही बोलतोय ते टीव्ही अभिनेता विवियन डीसेना आणि वाहबिज दोराबजी यांच्याबद्दल.
अनेक वर्षांपासून वेगळं होण्याचा निर्णय या दोघांनी घेतला असतानाही अजूनपर्यंत विवियन आणि वाहबिजने घटस्फोट का घेतला नाही असाच प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. स्पॉटबॉयने सूत्रांच्या माहितीने सांगितले की, या घटस्फोटाचं कारण कौटुंबिक हिंसाचार आहे. प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, घटस्फोटासाठी निवेदन करताना वाहबिजने विवियनवर घरगुती हिंसाचारासोबत अनेक आरोप लावले.
व्यायाम करतानाही सलमानला आजूबाजूला लागतात सुपरस्टार, हा घ्या पुरावा
टीव्ही कपल विवियन डीसेना आणि वाहबिद दोराबजी यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. २०१६ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१७ मध्ये दोघांनीही मान्य केलं की त्यांचं नातं हे सुधारण्यापलिकडे गेलं आहे.
करण जोहरच्या मुलांना सांभाळतेय गौरी खान, PHOTO VIRAL
आजतकने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वाहबिजला तिचं खासगी आयुष्य सर्वांसमोर यावं असं वाटत नव्हतं. यासोबतच तिने पोटगीसाठी घटस्फोट घेण्यास उशीर झाल्या बातमीत तथ्य नसल्याचं म्हटलं. ती म्हणाली की, ‘एका पत्नीचा तो हक्क असतो की तिच्या नवऱ्याच्या कमाईतील २० टक्के हिस्सा मागू शकते. पण मी यावर काही बोलू इच्छित नाही.’
OMG! 'द मेट गाला'साठी दीपिकानं खरेदी केली चक्क एवढ्या लाखांची बॅग
घरगुती हिंसेबद्दल वाहबिजशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. विवियन- वाहबिद स्टार वनवर आलेल्या 'प्यार की ये एक कहानी' मालिकेत पहिल्यांदा भेटले होते. तिथूनच दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली. सध्या विवियन 'शक्ती- अस्तित्व के एहसास की' या मालिकेत हरमन ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
फक्त काही तासांसाठी तब्बल एवढ्या कोटींचे कपडे घालून निघाली प्रियांका चोप्रा
VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं