एकमेकांवर वस्तू फेकून मारायचे अर्जुन आणि मेहर, त्या भांडणानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

एकमेकांवर वस्तू फेकून मारायचे अर्जुन आणि मेहर, त्या भांडणानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

असं म्हटलं जातं की, दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर अर्जुनने घर सोडलं होतं आणि तो काही दिवस भाड्याच्या घरात राहायचा.

  • Share this:

मुंबई, 5 मे- अर्जुन रामपाल आणि त्याची एक्स पत्नी मेहर जेसिआने त्यांच्या लग्नाच्या २० वर्षांनंतर घटस्फोट घेतला. अर्जुन आणि मेहरच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. बी- टाउनमध्ये तर दोघांच्या नात्यांबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या.

असं म्हटलं जातं की, दोघांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर अर्जुनने घर सोडलं होतं आणि तो काही दिवस भाड्याच्या घरात राहायचा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि मेहरचं आदल्या रात्री कडाक्याचं भांडण झालं. या भांडणानंतर दोघांनी दुसऱ्या दिवशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

‘या बाईने माझ्या भावाला फसवलंय’, मान्यतासाठी प्रियाने संजय दत्तला सुनावलं

मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटाचा निर्णय घेण्यासाठी दोघांनी फार वेळ लावला. यामागे कारण होतं त्यांच्या दोन मुली मायरा आणि माहिका. दोघांनाही वाटत होतं की, त्यांच्या मुलींना घटस्फोटाचा अर्थ कळावा. सुरुवातीला अर्जुनच्या घटस्फोटाचं कारणं हृतिकची पत्नी सुझेन खान असल्याचं म्हटलं जात होतं.

‘आता सगळं लीगल आहे’, म्हणत या अभिनेत्रीने केलं दुसऱ्या अभिनेत्रीला प्रपोज

इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एक दिवस मेहरला कळलं की अर्जुन आणि सुझान भेटतात त्यावरून त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या अहवालाने म्हटलं की, ‘मेहर- अर्जुनमधलं नातं दिवसेंदिवस खराब होत चाललं होतं. २०१६ मध्ये पहिल्यांदा अर्जुन स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरात राहायला गेला.’

हनीमूनला पॅरिसला जातो सांगून शाहरुख या ठिकाणी घेऊन गेला गौरीला, स्वतः केला खुलासा

या जोडप्याच्या जवळील एका फिल्ममेकरने सांगितले की, ‘दोघं फार जोरात भांडत होती आणि एकमेकांवर सामान फेकत होते. त्यांच्या या भांडणाला वैतागून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली. हे काही त्यांचं पहिलं भांडणं नव्हतं. यानंतर मेहरने शेजाऱ्यांची लगेच माफी मागितली तर अर्जुन दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला.’

सलमानच्याच पावलांवर पाऊल ठेवतं कतरिनानेही घेतली महागडी कार

या भांडणानंतर अर्जुन आणि मेहर यांचे रस्ते कायमसाठी वेगळे झाले. दुसऱ्याच दिवशी दोघांनी सोशल मीडियावर स्टेटमेन्ट शेअर करत म्हटलं की, ’२० वर्षांचा प्रवास फार सुंदर आणि अविस्मरणीय होता. पण प्रत्येक रस्त्याचे मार्ग वेगवेगळे असतात. आम्हाला वाटतं की, एकमेकांपासून दूर जाऊन आणि मार्ग वेगळे करण्याची हीच योग्य वेळ आहे.’

VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2019 05:17 PM IST

ताज्या बातम्या