• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पोलीस हो तुमच्यासाठी! कोरोना योद्धांसाठी सरसावले मराठी सेलिब्रिटी

पोलीस हो तुमच्यासाठी! कोरोना योद्धांसाठी सरसावले मराठी सेलिब्रिटी

अभिनेत्री पर्ण पेठे (Parna pethe) आणि अभिनेते आनंद इंगळे (Anand ingale) यांनी कोरोना योद्धा पोलिसांसाठी एक स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे.

 • Share this:
  पुणे, 24 मे : कोरोनाच्या या कठीण काळात आरोग्य कर्मचारी, पत्रकार आणि पोलीस (Police) हे लोक आपला जीव धोक्यात घालून लोकांसाठी धडपडत आहेत. अहोरात्र त्यांची सेवा करत आहेत. स्वतःचं कुटुंब सोडून आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत. पण हे सर्व करत असताना त्यांच्यावर मानसिक ताण (Mental stress on Police) येतो आणि त्यांना मानसिक आधार (Mental health of police) देण्यासाठी मराठी कलाकार सरसावले आहेत. या पोलिसांसाठी समुपदेशन (Counselling for police) सुरू करण्यात आलं आहे. कोरोना संकटातही आपलं कुटुंब आणि आपलं आरोग्य धोक्यात घालत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी मराठी कलाकारांनी एक उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्यासाठी टेलिफोन काऊन्सलिंग सुरू करण्यात आलं आहे. रमा-माधव फेम अभिनेत्री पर्ण पेठे (Parna pethe) आणि अभिनेते आनंद इंगळे (Anand ingle) यांनी हा पुढाकार घेतला आहे. पर्ण पेठेने आपल्या फेसबुकवर याबाबत पोस्ट केली आहे. कोरोना संकटाचा सामना करत असताना पोलीस आपल्या मनातील राग, चिंता अशा भावना इतर कुणासमोरही मांडू शकत नाही. आधीच कुटुंब चिंतेत असल्याने आपल्या कुटुंबासमोरही ते व्यक्त होत नाही. आपला हा मानसिक ताण कमी करण्यासाठी, मनमोकळं करता यावं यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. हे समुपदेशन विनामूल्य आणि गोपीनीयही असेल, अशी खात्री देण्यात आली आहे. अधिक माहिती किंवा अपॉइटमेंटसाठी 7414948259 वर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या क्रमांकावर प्रशिक्षित समुपदेशक समुपदेशन करतील. हे वाचा - प्रेग्नंट, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनाही मिळणार कोरोना लस; पण एक अट फक्त पोलीसच नव्हे तर सामान्य लोकांसाठीही कोरोना संकटात अशीच हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. हे समुपदेशनसुद्धा विनामूल्य आहे. यासाठी दोन फोन क्रमांक जारी करण्यात आले होते. 9960779000 आणि 9422311458 या क्रमांकावर संपर्क कऱण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हे वाचा - नसलेला आवाज ऐकू येणं, कुणी नसतानाही दिसणं; फक्त भास नाही तर गंभीर आजार दरम्यान याआधीसुद्धा काही मराठी कलाकारांनी कोरोना संकटात सेवा देणाऱ्या पोलिसांच कौतुक केलं होतं.  अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh),  मृण्मयी देशपांडे (Mrunmai Deshapande), अक्षया देवधर(Akshaya Devdhar) आणि संस्कृती बालगुडे (Sanskriti Balgude)  यांनी पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनला (Sinhgad Police Station) भेट दिली होती. पोलिसांना प्रोत्साहन देत त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं. अशा उपक्रमामुळे पोलिसांना त्यांच्या कार्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. तसंच ही सेवा अविरत सेवा सुरू ठेवण्यासाठी बळसुद्धा मिळतं.
  Published by:Priya Lad
  First published: