'यापुढे कोणत्याही निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान होणार नाहीत'

भाजपने दिलेलं कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे भाजपचा पंतप्रधान आता होणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 09:00 PM IST

'यापुढे कोणत्याही निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान होणार नाहीत'

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

अहमदनगर, 26 एप्रिल : यापुढच्या कोणत्याही निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. संगमनेरमध्ये आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी चव्हाणांनी विरोधकांवर टीका केली. या सभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही उपस्थित आहेत.

भाजपने दिलेलं कोणतंही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे भाजपचा पंतप्रधान आता होणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन करण्याची भाजपची घोषणा फोल ठरली. 2014 साली आमची झालेली चुक आम्हाला लक्षात आली आहे. त्यामुळे आता भाजप निवडूण येणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

विरोधी पक्ष आता एकत्र आले - पृथ्वीराज चव्हाण

आताच्या निवडणुकांमध्ये भाजपला शह देण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे आता मोदी पंतप्रधान होणार नाहीत. जर मोदी सत्तेवर आले तर घटना राहणार नाही. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

Loading...

भाजपच्या उज्वल योजना अपयशी ठरली, केवळ खातं उघडण्याचा विक्रम करण्यासाठी जनधन योजना आखण्यात आल्याची टीकाही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

महाराष्ट्रात भाजपाची सत्ता राहणार नाही. तर काँग्रेसचं सरकार येणार असा नाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी या सभेवेळी दिला. या सभेसाठी अशोक चव्हाण, मल्लीकार्जून खरगे, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात व्यासपीठावर उपस्थित होते. भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी राहुल गांधी यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.


SPECIAL REPORT : मोदींना बदलत्या हवेचा अंदाज आलाय का?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...