नवी दिल्ली, 28 जून: कोरोनामुळे देशात लागू असलेल्या लॉकडाऊनचा चांगल्या चांगल्यांना आर्थिक फटका बसला आहे. एकीकडे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर दुसरीकडे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. यातच देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हेही वाचा.. Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी दिल्लीतील एका प्रतिष्ठित शाळेचा मालकच ब्लॅकमेलर बनला आहे. खोट्या खटल्यात फसवून त्यानं आतापर्यत अनेक कोट्यधिश व्यावसायिकांना ब्लॅकमेल करत धमकी दिल्या आहेत. एवढंच नाही तर आरोपीच्या धमकीला कंटाळून अखेर एका तांदुळ व्यावसायिकानं आत्महत्या केली आहे. या प्रकरणी दिल्लीतील राणी बाग पोलिस स्टेशनमध्ये शाळेच्या मालक, त्याचा मुलगा आणि प्राचार्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिल्लीतील रोहिणी सेक्टर 3 मध्ये ही प्रतिष्ठित शाळा आहे. तादुंळ व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून त्याला धमकी देऊन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी शाळेचा मालक, मुलगा, शाळा प्राचार्य आणि एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शुल्क वसूल करण्यावर सरकारनं निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शाळेचं मोठं आर्थिक नुकसान झालं. हे नुकसान भरून काढण्यासाठी शाळा मालक आणि त्याच्या मुलानं ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा सुरू केला. हेही वाचा.. रागाच्या भरात पतीनं विहिरीत दिलं झोकून, वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीचा करुण अंत तांदुळ व्यापारी भूपेंद्र गुप्ता (वय-51) यांची सुमारे 20 कोटींची प्रॉपर्टी हडपण्याचा कट रचला. व्यापाऱ्याला त्याचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ दाखवून त्याच्या विरोधात खटला दाखल करण्याची धमकी दिली. या कामात बाप-मुलानं शाळेचा प्राचार्य आणि एका कर्मचाऱ्याचीही मदत घेतली होती. मृत तांदुळ व्यापारी भूपेंद्र गुप्ता यांच्या पुतण्यानं दिलेली माहिती अशी की, भूपेंद्र गुप्ता यांनी रोहिणी सेक्टर 3 येथील प्रतिष्ठित शाळेचा मालक, त्याचा मुलगा आणि प्राचार्यानं 20 जून रोजी स्कूल मीटिंगला बोलावलं होतं. आरोपींनी गुप्ता यांना सुरत येथील त्यांच्या संबंधित अश्लिल फोटो आणि व्हिडीओ दाखवून त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची धमकी दिली. एवढंच नाही तर प्रॉपर्टीच्या दस्ताऐवजवर स्वाक्षरी करून 20 कोटींची प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची धमकी दिली होती. दरन्यान, आरोपी आणि भूपेंद्र गुप्ता हे एकेकाळी बिझनेस पार्टनर होते. त्यामुळे दोघांना एकमेकांबाबत परिपूर्ण माहिती होती. आरोपींच्या धमकी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून 25 जूनरोजी सुब्ह प्रीतमपुरा येथील राहत्या घरी सल्फासच्या गोळ्या खाऊन भूपेंद्र गुप्ता यांनी आत्महत्या केली होती. दरम्यान, भूपेंद्र गुप्ता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाइड नोट सापडली आहे. त्यातून या सगळ्या प्रकाराचा खुलासा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.