रागाच्या भरात पतीनं विहिरीत दिलं झोकून, वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीचा करुण अंत

रागाच्या भरात पतीनं विहिरीत दिलं झोकून, वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीचा करुण अंत

रागाच्या भरात विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीनेही उडी घेतली.

  • Share this:

शिर्डी, 28 जून: रागाच्या भरात विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीनेही उडी घेतली. मात्र, यात दोघांनाही आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. भाऊ आणि वहिनीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या बहीण थोडक्यात बचावली आहे.

हेही वाचा...कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली कळकळीची विनंती

मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेलवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. रेलवाडी येथील रहिवाशी असलेल्या ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-30 वर्षे) आणि पत्नी कविता खोतकर (वय-25) या दोघांचे शनिवारी रात्री किरकोळ कारणाहून भांडण झालं. नंतर संतापलेल्या ज्ञानेश्वरने थेट शेतातील विहिरीकडे धाव घेतली आणि स्वतःला विहिरीत झोकून दिलं. पतीला वाचवण्यासाठी पत्नीनेही मागोमाग विहिरीत उडी घेतली. दोघो विहिरीत पडल्याचं बघून ज्ञानेश्वरची बहीण जनाबाई खोतकर हिनं  आरडाओरडा करत गावकऱ्यांना हाका मारल्या. नंतर तिनेही भाऊ आणि वहिनीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. सुदैवानं गावकऱ्यांनी टाकलेला दोर तिच्या हाती लागला. तिने दोर पकडल्यानं तिचा जीव थोडक्यात बचावला. मृत खोतकर दाम्पत्यावर रेलगाडी येथे रविवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा..TikTok ने प्रोफाईल फोटोमध्ये लावला भारताचा झेंडा, भडकलेले नेटकरी म्हणाले ‘RIP’

याबाबत मृत ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम कचरू खोतकर (60) यांनी दिलेल्या खबरीवरून कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे हे करत आहेत.

First published: June 28, 2020, 3:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading