Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर

Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर

Lockdown वाढवला तर आर्थिक स्थिती खालावत जाते तर Unlock-2 लागू करायचा झाल्यास आधिक मोकळीक द्यावी लागते. ती दिली गेली तर पुन्हा रुग्ण वाढण्याचा धोका असतो.

  • Share this:

नवी दिल्ली 28 जून: भारतात कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज नव नवे आकडे समोर येत आहेत. मृत्यूमुखी पडणाऱ्यांचाही आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यायचे या व्दिधा मनस्थितीत देशातली सर्वच राज्य सरकारे आहेत. Lockdown वाढवला तर आर्थिक स्थिती खालावत जाते तर Unlock-2 लागू करायचा झाल्यास आधिक मोकळीक द्यावी लागते. ती दिली गेली तर पुन्हा रुग्ण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेक राज्य सरकारांनी राज्यातली स्थिती पाहून निर्णय घेतले आहे.

सर्व देशात काय स्थिती आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महाराष्ट्र - राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभं राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. त्यामुळे 30 जून नंतर फार काही सूट मिळणार नाहीत असेच संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

झारखंड- राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता लॉकडाउन 31 जूलैपर्यंत असेल असं राज्य सरकारने जाहीर केलंय. आधीच्या लॉकडाउनची मुदत 30 जूनपर्यंतच होती. पूर्वीसारखच त्याची कडक अंमलबजावणी असणार आहे.

पश्चिम बंगाल- पश्चिम बंगाल मध्ये लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. यात आता काही सुटही देण्यात आली आहे. रात्रीच्या संचारबंदीत 1 तासांची सुट देण्यात आली आहे. आता 9 ऐवजी रात्री 10 वाजता संचारबंदी सुरू होणार आहे.

हे वाचा - धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी संख्या, 24 तासांमध्ये वाढले 5318 रुग्ण 5

दिल्ली- दिल्लीत 31 जुलैपर्यंत शाळा आणि कॉलेजेस बंद असतील. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. आता लॉकडाऊन लागू केला जाणार नाही असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. देशात सगळ्यात जास्त रुग्ण संख्या वाढणाऱ्या शहरांमध्ये दिल्लीचाही समावेश आहे.

आसाम- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राजधानी गुवाहाटी आणि कामरुप जिल्ह्यात रात्री 12 तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर राजधानी गुवाहाटीमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून 14 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. त्यात मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.

तेलंगाना- अनलॉक नंतर बाजारपेठा सुरू झाल्या आणि गर्दी वाढली. त्यामुळे रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे गर्दीचं ठिकाण असलेला बेगम बाजार रविवारपासून आठ दिवस बंद राहणार आहे.

तमिळनाडू- तमिळनाडूची राजधानी चेन्नई, मदुराई, चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या शहरांमध्ये 19 जूनपासून 12 दिवसांचा लॉकडाउन असणार आहे.  चेन्नई आतापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय.

हे वाचा - Covid - 19 : लग्नसोहळा आयोजित करणाऱ्याला 6 लाखांचा दंड, काय आहे कारण?

कर्नाटक – राजधानी बंगळूरुमध्ये कोरोनाचा धोका असला तरी लॉकडाऊन लावला जाणार नाही असं कर्नाटक सरकारने जाहीर केलं आहे. आयटी शहर असलेल्या बंगळूरुमध्ये आर्थिक व्यवहार आता सुरू झाले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नसून कोरोनाला रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येईल असं राज्य सरारने म्हटलं आहे.

सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारत सरकारने 1 जूनपासून अनलॉक म्हणजे लॉकडाऊन सुलभ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही सुरुवातीच्या 15 दिवसांत घडले आहेत.

संपादन - अजय कौटिकवार

 

 

First published: June 28, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading