जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

जखमींची विचारपूस करताना पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी

पंतप्रधानांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. जखमींमध्ये काही महिला, पुरूष आणि तरूणही होते. त्यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनाही गहिवरून आलं.

  • Share this:

मिदनापूर,ता.17 जुलै : पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर इथं झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेदरम्यान मंडप कोसळ्याने 20 जण जखमी झाले. पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच हा मंडप कोसळला आणि सभेत गोंधळ उडाली. भाषण मध्येच थांबवत पंतप्रधानांनी आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजी अधिकाऱ्यांना जखमींना मदत करण्याच्या सूचना केल्या. आणि पंतप्रधानांनी जखमींची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. जखमींमध्ये काही महिला, पुरूष आणि तरूणही होते. त्यांच्याशी बोलताना पंतप्रधानांनाही गहिवरून आलं. सर्व जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी डॉक्टरांना दिल्या. मिदनापूर इथं पंतप्रधानांची जाहीर सभा होती. शेतकऱ्यांसाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आणि उपाय योजना जाहीर केल्या त्या सांगतानाच पंतप्रधानांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी

मोदींच्या सभेत नेमकं काय घडलं ?, पहा थेट घटनास्थळाचे PHOTO

सभेत नेमकं काय झालं

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या कार्यक्रमात मोठा अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील मिद्नापूर येथे सभा सुर असताना तेथे बांधण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला. यात अनेक लोकं त्या मंडपाखाली सापडले. या अपघातामध्ये 20 लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोदींचं भाषण सुरू असताना अचानक मंडप खाली पडला. त्यावेळ मोदी थांबले आणि त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजी कमांडोला काय प्रकार घडला आहे ते पाहण्याचे आदेश दिले. त्यावर त्यांना मंडप पडल्याचं समजंल. जखमींना रुग्णालयात नेण्याची सोय करण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. सतत पाऊस पडत असल्याने मैदानातील माती ओली झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

First published: July 16, 2018, 3:13 PM IST

ताज्या बातम्या