जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Heeraben Modi Health Updates: आईला भेटून PM नरेंद्र मोदी दिल्लीला रवाना; प्रकृती स्थिर, उपचार सुरू

Heeraben Modi Health Updates: आईला भेटून PM नरेंद्र मोदी दिल्लीला रवाना; प्रकृती स्थिर, उपचार सुरू

Heeraben Modi Health Updates: आईला भेटून PM नरेंद्र मोदी दिल्लीला रवाना; प्रकृती स्थिर, उपचार सुरू

Narendra Modi Mother Health Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोदीच्या आईंना सध्या अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हिराबेन यांचे वय 100 वर्षांहून अधिक आहे. या वर्षी जून महिन्यात त्यांनी 100 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. आई आणि मुलाचं अतूट नातं; PM मोदींचे यांच्या आईसोबतचे हे खास फोटो बघितले का?

PM मोदी नेहमीच आपल्या आईसोबत म्हणजेच हिराबेन मोदी यांच्यासोबत वेळ घालवताना आणि त्यांचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच आपल्या गुजरात दौऱ्यावर जाताना आपल्या आईची नक्कीच भेट घेतात. आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात