मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

PM Cares Fund च्या बनावट खात्यांपासून सावधान! 9 पेक्षा जास्त खोटे UPI ID

PM Cares Fund च्या बनावट खात्यांपासून सावधान! 9 पेक्षा जास्त खोटे UPI ID

PM Cares Fund मध्ये दान करणाऱ्यांची याच नावाशी मिळत्या-जुळत्या असणाऱ्या बनावट युपीआय आयडींमुळे (UPI ID) फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

PM Cares Fund मध्ये दान करणाऱ्यांची याच नावाशी मिळत्या-जुळत्या असणाऱ्या बनावट युपीआय आयडींमुळे (UPI ID) फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

PM Cares Fund मध्ये दान करणाऱ्यांची याच नावाशी मिळत्या-जुळत्या असणाऱ्या बनावट युपीआय आयडींमुळे (UPI ID) फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 05 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) संकटाशी दोन हात करत असतानाच देशातील सायबर सुरक्षेवर लक्ष ठेवणारी नोडल एजन्सी सर्ट-इन (CERT-In) यांनी एका वेगळ्या धोक्याकडे देशाचं लक्ष वेधलं आहे. PM Cares Fund मध्ये दान करणाऱ्यांनी याच नावाशी मिळत्या-जुळत्या असणाऱ्या बनावट युपीआय आयडींपासून (UPI ID) सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.  पीएम केअर फंडमध्ये दान करताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, सरकारकडून जारी करण्यात आलेला अधिकृत युपीआय आयडी 'पीएमकेअर्स@एसबीआई’ (pmcares@sbi) हा आहे. पीएम केअर्समध्ये या युपीआय आयडीची नोंधणी करण्यात आली आहे. सरकारला या बनावट आयडींची माहिती मिळाली आहे -पीएमकेअर्स@पीएनबी (pmcares@pnb), -पीएमकेअर्स@एचडीएफसीबँक (pmcares@hdfcbank), -पीएमकेअर@येसबँक (pmcare@yesbank), (हे वाचा-लॉकडाऊमध्ये पैसे संपले तरी SBI ग्राहकांना चिंता नाही,बँक देतेय डोअर स्टेप सुविधा) -पीएमकेअर@वाईबीएल (pmcare@ybl), -पीएमकेअर@यूपीआय (pmcare@upi) -पीएमकेअर@एसबीआय (pmcare@sbi) -पीएमकेअर्स@आईसीआईसीआय (pmcares@icici), त्यामुळे सर्ट-इनने दान करण्याआधी युपीआय आयडीची खात्री करून घेण्याची सूचना दिली आहे.  pmcares@sbi या आयडीव्यतिरिक्त कोणताही युपीआय आयडी बनावटच आहे. (हे वाचा-कारभार ठप्प असताना कर्मचाऱ्यांना पगार कसा देणार? कंपन्यांचा सरकारला सवाल) देशाला कोरोनाशी लढण्यासाठी मनोबल तर हवंच आहे, पण त्याचबरोबर गरज आहे ती आर्थिक मदतीची. देशातील अनेक मोठ्या उद्योगपतींनी मदतीचा हात पुढे केला आहे. देशात मास्क, सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर्सपासून अनेक प्रोटेक्टिव्ह संसाधनांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM Care Fund ची घोषणा केली आहे, ज्यामध्ये देशातील प्रत्येक नागरिक स्वेच्छेने काही आर्थिक मदत करू शकतो. या योजनेतून 100 कोटी जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अनेक गरजूंसाठी आर्थिक मदत गोळा करण्यात येत आहे. मात्र मदत करताना सावधानता बाळगा आणि जागरूक राहा असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे.
First published:

Tags: PM Naredra Modi

पुढील बातम्या