मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लॉकडाऊमध्ये पैसे संपले तरी SBI ग्राहकांना चिंता नाही, बँक देतेय 'डोअर स्टेप' सुविधा

लॉकडाऊमध्ये पैसे संपले तरी SBI ग्राहकांना चिंता नाही, बँक देतेय 'डोअर स्टेप' सुविधा

कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांना बँकांच्या कामासाठी त्रास सहन करावा लागू नये याकरता एसबीआय (SBI) ने डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांना बँकांच्या कामासाठी त्रास सहन करावा लागू नये याकरता एसबीआय (SBI) ने डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांना बँकांच्या कामासाठी त्रास सहन करावा लागू नये याकरता एसबीआय (SBI) ने डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 05 एप्रिल : देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) त्यांच्या ग्राहकांसाठी विविध योजना घेऊन येत असते. सध्या देशासमोर कोरोनाचं (Coronavirus) संकट आहे. अशा परिस्थितीत लोकांना बँकांच्या कामासाठी त्रास सहन करावा लागू नये याकरता एसबीआय (SBI) ने डोअर स्टेप सेवा सुरू केली आहे. बँकेची अनेक काम घरबसल्या करता येणार आहेत. अगदी तुम्हाला पैशांची गरज असेल, तर पैसे देखील ग्राहकांच्या घरी पोहोचते करण्यात येणार आहेत. याआधी ही सुविधा केवळ दिव्यांग ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी होती. (हे वाचा-कारभार ठप्प असताना कर्मचाऱ्यांना पगार कसा देणार? कंपन्यांचा सरकारला सवाल) मात्र कोरोना लॉकडाऊमुळे घराबाहेर पडणं अशक्य आहे. त्यामुळे विविध कामांचा खोळंबा होऊ शकतो. याकरता एसबीआयने हे पाऊल उचलले आहे. मात्र ज्यांनी केवायसी अपडेट केले आहे, त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला होम बँचशी संपर्क करावा लागेल. काय आहे सुविधा? या योजनेअंतर्गत रक्कम जमा करणे आणि काढणे, चेक देणे, ड्राफ्ट डिलिव्हरी, टर्म डिपॉझिट अॅडव्हाअसची डिलिव्हरी आणि लाइफ सर्टिफिकेट यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान 1800111103 या नंबरवर संपर्क साधू शकता. या सुविधेसाठी रजिस्ट्रेशन होम ब्रँचमध्ये करावं लागेल. गैर-आर्थिक व्यवहारासांठी 60 रुपये आणि जीएसटी प्रति व्हिझीट शूल्क आकारण्यात येईल तर आर्थिक व्यवहारांसाठी 100 रुपये आणि जीएसटी प्रति व्हिझीट शूल्क आहे. रोख रक्कम काढण्यासाठी आणि ठेवी जमा करण्यासाठी 20 हजारांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या बँका सुद्धा देत आहेत डोअर स्टेप सर्व्हिस एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI), एक्सिस बँक (Axis Bank) आणि कोटक बँक (Kotak Bank) डोअर स्टेप सर्व्हिस देत आहेत.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या