Home /News /news /

पोलिसांचा ताफा सोसायटीत येतो, 15 वर्षांच्या मुलाला घरातून बाहेर काढता आणि...

पोलिसांचा ताफा सोसायटीत येतो, 15 वर्षांच्या मुलाला घरातून बाहेर काढता आणि...

कारण एवढ्या रात्री आलेले हे पोलीस कुणावर कारवाई करण्यासाठी आले नव्हते, तर...

पिंपरी, 27 एप्रिल :  रात्री 11 ची वेळ...अचानक पोलिसांचा ताफा सायरन वाजवत परिसरात दाखल होतो..पोलीस कॉन्स्टेबल आणि अधिकारी एका सोसायटीमध्ये प्रवेश करतात आणि एका बिल्डिंगमध्ये जाऊन 15 वर्षीय मुलाला पार्किंगमध्ये घेऊन येतात. सोसायटीतील लोकं बाल्कनी आणि गच्चीतून हे दृश्य पाहून चिंतातूर होतात. मात्र, काही वेळातच सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलते. कारण एवढ्या रात्री आलेले हे पोलीस कुणावर कारवाई करण्यासाठी आले नव्हते, तर चक्क एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. सुखद धक्का देणारी ही घटना घडली आहे पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात. हेही वाचा - शहरात अडकलेल्या मजुरांना गावची दारं बंदच? सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नाहीच सध्या लॉकडाउन असल्याने अनेक जण परदेशात अडकलेले आहेत. सांगवीचे रहिवासी राजीव लोचन हे देखील अमेरिकेत अडकले आहे. रविवारी त्यांचा मुलगा वत्सल्यचा वाढदिवस होता.  मात्र ते अमेरिकेमध्ये असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये येणे शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी थेट पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई  यांना दोन दिवसांपूर्वी ईमेल करून मुलाचा वाढदिवस असल्याची माहिती दिली. आणि एकुलत्या एक मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता येत नसल्याची खंत ही व्यक्त केली. हेही वाचा - 'ज्या' महिलेची केली चौकशी तिचा झाला कोरोनाने मृत्यू, पोलीस अधिकारी हादरले आणि... त्यावेळी पोलीस आयुक्त बिष्णोई ह्यांनी सांगवी पोलिसांना सूचना दिल्या आणि रविवारी रात्री मुलगा राहत असलेल्या सोसायटीत पोहोचले. अचानक जाऊन पोलिसांनी  त्याला असा सुखद धक्का देत त्याचा वाढदिवस उत्साहात  साजरा केला. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी  24 तास ड्युटीवर असणारे अनेक पोलीस कर्मचारी आपल्या मुलांना मागील एक महिन्यांपासून जवळही घेऊ शकत नाही. मात्र,  केवळ  एका बापाच्या इच्छेखातर आणि या 15 वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर हसू उमटावे, यासाठी पोलिसांनी खास ड्युटी निभावली. पोलिसांच्या या संवेदनशील ड्युटीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pimpri chinchwad

पुढील बातम्या