मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरे काय राव हे काय पोरगं आहे! राइडवर बसलेल्या या चिमुकल्याचा VIDEO पाहून व्हाल हैराण

अरे काय राव हे काय पोरगं आहे! राइडवर बसलेल्या या चिमुकल्याचा VIDEO पाहून व्हाल हैराण

झोपाळ्यावरील मुलाला असं पाहून सर्वजण थक्क.

झोपाळ्यावरील मुलाला असं पाहून सर्वजण थक्क.

एका राइडवर बसलेल्या चिमुकल्याच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 05 सप्टेंबर : आपल्यापैकी प्रत्येक जण किमान आकाशपाळण्यात तरी बसला असेल. या आकाशपाळण्यातच किती तरी जणांची हवा टाइट होते. अम्युझमेंट पार्क जिथं अशा बऱ्याच खतरनाक राइड असतात. ज्या पाहूनच कित्येकांचा काळजात धस्सं होतं. त्यात बसणं दूर पण पाहण्याची हिंमत अनेकांमध्ये नसते. काही जण या राइडवर बसतात पण त्यानंतर मात्र त्यांना घाम फुटतो. अशाच एका अम्युझमेंट पार्कमधील राइडचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका चिमुकल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आता खतरनाक राइड म्हटलं की लोकांचं किंचाळणं, ओरडणं, घाबरणं हे आलंच. शक्यतो असेच व्हिडीओ पाहायला मिळतात. पण हा चिमुकला मात्र याला अपवाद ठरला असंच म्हणावं लागेल. इतर लोक किंचाळत असताना या मुलाच्या शांततेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक बोटीसारखी राइड आहे जी मागेपुढे होते आहे. झोपाळ्यासारखी झुलते आहेत. त्यावर एका सीटवर हा मुलगा एकटा बसला आहे. त्याने झोपाळ्याच्या कडेला एक हात पकडला आहे. त्याच्यामागे मोठी माणसं दिसत आहेत.

हे वाचा - तुर्कीश आईस्क्रीम विक्रेता आईस्क्रीम देत नाही, म्हणून लहान मुलानं लढवली शक्कल... पाहा व्हिडीओ

मुलाच्या मागे असलेले बहुतेक लोक घाबरत ओरडताना दिसत आहेत. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज येत आहे. तर चिमुकला मात्र अगदी शांत बसलेला दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर किंचितशीही भीती नाही. अगदी आरामात इकडेतिकडे पाहत तो बसला आहे. जणू काही हे आपल्यासाठी काहीच नाही.

बरं तो घाबरत तर नाहीच पण त्याला आनंद, उत्साहही वाटत नाही आहे. म्हणजे सामान्यपणे एखाद्या राइडवर बसल्यावर मुलं जशी आनंदाने हसतात, राडची मजा घेतात तशी मजाही हा मुलगा घेत नाही आहे. उलट तो कंटाळलेला दिसतो आहे. त्याला इतका कंटाळा आला की तो जांभईही देतो.

हे वाचा - विसर्जनाची वेळ, चिमुरड्याने घर घेतलं डोक्यावर पण बाप्पाला सोडेना; डोळ्यात पाणी आणणारा Video

लॅड बायबल ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ नेमका कुटला आणि कधीचा आहे हे माहिती नाही. व्हिडीओ पाहून बरेच लोक हैराण झाले आहेत. त्यांनी कमेंटही केल्या आहेत. मुलाच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Viral, Viral videos