मुंबई 6 सप्टेंबर : कार्यक्रम कोणताही असो, तो नाच-गाण्याशिवाय पूर्णच होत नाही. ज्यामुळे बहुतांश कार्यक्रमात लोक आवर्जून नाच-गाण्याचा प्रोग्राम ठेवतात. ज्यामुळे इतर लोक या कार्यक्रमाबद्दल उत्साही असतात आणि त्याचा मनसोक्त आनंद लूटतात. सोशल मीडियावर आपल्याला डान्सचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.
हा व्हिडीओ एका कार्यक्रमामधील आहे. जेथे तुम्हाला काही महिला हरियाणवी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. एक महिला तर आपल्या डान्समध्ये अशी काही गुंग झाली आहे की, तिला आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींचा विसर पडला आहे. परंतू त्याच दरम्यान या महिलेसोबत एक अपघात घडतो.
खरंतर या महिलेच्या मागे एक लहान मुलगा नाचत असतो. परंतू ही महिला डान्स करण्यात दंग असल्यामुळे तिला हे कळत नाही. तेव्हा ही महिला डान्स करताना स्टेप करत मागे येथे, तेव्हा या लहान मुलाच्या पायात पाय अडकून तिचा तोल जातो आणि ती या मुलावर पडते.
पाहा व्हिडीओ : Devar bhabhi Dance : दीराच्या लग्नात वहिनीनं धरला असा ताल, पाहून सगळेच झाले थक्क
ही महिला पाठीवर पडते, परंतू थोडाफार आपला तोल सांभाळते, ज्यामुळे तोल जाऊन सुद्धा ही महिला पूर्णपणे त्या लहान मुलावर पडली नाही. नशीबाने या मुलाला फारसं काही झालेलं नाही, परंतू फार मोठी घटना घडण्यापासून टळली आहे असंच म्हणावं लागेल.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही महिला पडल्यानंतर लगेच उठते. परंतू हा लहान मुलगा रडत असतो, तेव्हा त्याची आई त्याला उचलून घेते आणि त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न करते.
लहान मुलांना कार्यक्रमात नाचायला आवडते, पण मोठे लोक जेव्हा डान्स फ्लोअरवर नाचत असतात, तेव्हा मुलांना नाचण्यासाठी सुरक्षित जागा शोधा, नाही तर या लहाम मुलासोबत घडला तसा प्रकार तुमच्या मुलांसोबत देखील घडू शकतो, नशीबाने या मुलाला काही गंभीर दुखापत झाली नाही. परंतू हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाजा लावूच शकता की, या मुलासोबत काय घडलं असतं.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘patiale_wale_chacha_ji’ नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लोकांकडून खूपवेळा पाहिलं गेलं आहे. तर अनेक युजर्स या महिलेला ट्रोल करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Top trending, Video viral, Viral news