Home /News /news /

आता काय बोलावं! क्वारंटाइन सेंटरमध्येही लोकांना हवी VIP सेवा

आता काय बोलावं! क्वारंटाइन सेंटरमध्येही लोकांना हवी VIP सेवा

क्वारंटाइन सेंटरमध्ये अमुक सुविधा हव्या आहेत. याठिकाणी स्वतंत्र शौचालय असावं वेळच्या वेळी जेवण, नाश्ता, चहा सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा करत आहेत.

दापोली, 12 मे : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला क्वारंटाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दापोली शहरातील कोकण कृषी विद्यापीठाच्या  शेतकरी भवनामध्ये काही लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु, या क्वारंटाइन सेंटरमध्ये काही लोकांना व्हीआयपी रूम हवी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 'विलगीकरण कक्षातील रूम आपल्याला मान्य नाहीत  आपल्याला  व्हीआयपी रूम  हवी आहे', अशी मागणी काही दिवसांपूर्वी एका क्वारंटाइन व्यक्तीने केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीचे चोचले पुरविण्यासाठी त्यांना चक्क सुरक्षारक्षक पोलिसांची रूम देण्यात आली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एकीकडे  राज्यावर कोरोनाचे संकट आहे. अनेक जण या संकटात सापडली आहेत. आपला देश कठीण परिस्थितीतून जात आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सगळेजण सहकार्य करत आहेत. मात्र, असे असले तरी काही लोकं अवाजवी अपेक्षा  करीत आहे. आपल्याला  क्वारंटाइन सेंटरमध्ये अमुक सुविधा हव्या आहेत. याठिकाणी स्वतंत्र  शौचालय असावं वेळच्या वेळी जेवण, नाश्ता, चहा  सगळ्या गोष्टी  उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा करत आहेत. त्यामुळे त्यांना आपण कोणत्या परिस्थितीचा सामना करतोय यांचे भान असल्याचे वाटत नाही. हेही वाचा -113 वर्षांच्या आजीने कोरोनाला हरवलं; व्हायरसमुक्त होणारी सर्वात वयस्कर रुग्ण विलगीकरण कक्षाच्या रूम आपल्याला नाहीत  म्हणून  काही जणांनी  चक्क  विलगीकरण  कक्षाच्या  गेटवरच  झोपणे  पसंत केले होते. तसंच  आपल्याला  विलगीकरण कक्षात योग्य  मानसन्मान मिळाला नाही आमची व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशा स्वरूपाचे  कमेंट आणि  फोटो  सोशल मीडियावर  व्हायरल करून  प्रशासनाला  चांगलेच अडचणीत आणण्याचा  प्रकार सुद्धा  दापोली  क्वारंटाइन कक्षात घडला आहे. कठीण प्रसंगात काही पायाभूत सुविधांबाबत तडजोड करणे गरजेचं असताना सुद्धा काही लोकांनी केवळ प्रशासनाला टार्गेट करण्यासाठी मुद्दाम राजकीय पक्ष मार्फत दबाव सुद्धा आणल्याच्या काही घटना घडल्याचे बोलले जात आहे. आम्हाला अमुक नाष्टा नको, आम्हाला अमूक भाजी नको आम्हाला झोपायला गाधीच हवी, दिवसातून दहा वेळा शौचालय साफ करणारे व्यक्ती हवी तसेच नाश्त्यामध्ये व जेवणामध्ये काय काय असावे याबाबतची फर्माइश करून विलगीकरण  कक्षातील व्यक्तीकडून प्रशासनाला सहकार्य मिळणे ऐवजी मनस्तापच जास्त सहन करावा लागला. हेही वाचा -राज्यात मोठा निर्णय : कोरोनाच्या भीतीने अर्ध्या कैद्यांची होणार तुरुंगातून सुटका विलगीकरण कक्षात काम करण्यासाठी प्रशासनाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने काही बाबतीत लोकांनी सहकार्य करावे, अशी भावना वारंवार प्रशासनाकडून केली जात होती. मात्र, यावर कुठेही तडजोड न झाल्याने अखेर हतबल झालेल्या प्रशासनाने विलगीकरण कक्षातील लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, अशी भूमिका  घेतली.  शेवटी क्वारंटाइन करण्यात आलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दापोली शहरातील नवभारत छात्रालय, ए जी हायस्कूल, दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे शेतकरी भवन कृषी भवन या सर्व ठिकाणचे लोकांना सोमवारी त्यांच्या घरी पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. हेही वाचा - विधान परिषदेच्या उमेदवारीवरून एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले... क्वारंटाइन कक्षातील जेवण देण्यासाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, लॉकडाउनमुळे कामगार मिळत नाहीत तसंच उपलब्ध कामगारांना एवढ्या सगळ्या लोकांचे जेवण बनवणे सुद्धा कठीण होत होते. तसंच यामध्ये काही लोकांनी दररोज नको त्या मुद्यांवर  तक्रारी सुद्धा सुरू केल्या होत्या. विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या लोकांसाठी शौचालयाची कमतरता भासत होती. याठिकाणी साफसफाई करण्यासाठी दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. प्रशासनाला एकीकडे आपल्या जीवाची काळजी घेऊन कोरोनाशी लढताना दुसरीकडे दररोज विलगीकरण कक्षातील लोकांच्या अवास्तव मागणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे क्वारंटाइन मध्ये ड्युटी करणारे कर्मचारी दडपणाखाली काम करीत आहेत. दरम्यान, विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्यानंतर तेथील व्यवस्था मान्य नसल्याचे कारण सांगून विलगीकरण कक्षाच्या बाहेर झोपलेल्या कुटुंबावर दापोली प्रशासनाच्या वतीने दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात या कुटुंबातील महिलांचा देखील समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona, Dapoli, Ratnagiri

पुढील बातम्या