मराठी बातम्या /बातम्या /विदेश /113 वर्षांच्या आजीने कोरोनाला हरवलं; व्हायरसवर मात करणारी जगातील सर्वात वयस्कर रुग्ण

113 वर्षांच्या आजीने कोरोनाला हरवलं; व्हायरसवर मात करणारी जगातील सर्वात वयस्कर रुग्ण

100 वर्षांपूर्वी या आजीने स्पॅनिश फ्लूच्या महासाथीच्या परिस्थितीचाही सामना केला होता.

100 वर्षांपूर्वी या आजीने स्पॅनिश फ्लूच्या महासाथीच्या परिस्थितीचाही सामना केला होता.

100 वर्षांपूर्वी या आजीने स्पॅनिश फ्लूच्या महासाथीच्या परिस्थितीचाही सामना केला होता.

माद्रिद, 12 मे :  100 वर्षांपूर्वी कोवळ्या वयात स्पॅनिश फ्लूच्या महासाथीत जगून दाखवलं. आता वय झालं, शरीर थकलं तरी लढण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती मात्र तिळमात्रही कमी झाली आहे. शंभरी पार झाली तरी आजाराशी लढा देण्याची ताकद  100 वर्षांपूर्वीप्रमाणेच आहे हे दाखवून दिलं आहे, 113 वर्षांच्या आजीनं.

स्पेनमधील 113 वर्षांच्या महिलेनं महाभयंकर अशा कोरोनाव्हायरसला हरवलं आहे. कोरोनावर मात करणारी ती जगातील सर्वात वयस्कर रुग्ण आहे.

3 मुलांची आई असलेल्या या महिलेला एप्रिलमध्ये कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं, त्यानंतर ओल्ड एज केअर होममध्ये त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. कित्येक दिवस त्या कोरोनाशी दोनहात करत होत्या.  1918-1919 वेळी त्यांना स्पॅनिश फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी स्पॅनिश फ्लूवरही त्यांनी मात केली.

हे वाचा - महिलांपेक्षा पुरुषांमध्ये Corona चं प्रमाण जास्त का? शास्त्रज्ञांना उत्तर सापडलं

वयस्कर लोकांना आरोग्याच्या इतर समस्याही असतात, त्यामुळे त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका जास्त होतो आणि त्यातून वाचण्याची शक्यता कमी. मात्र लढण्याची आणि जगण्याची इच्छाशक्ती तीव्र असेल तर अशक्यही शक्य करता येऊ शकतं हे या महिलेनं दाखवून दिलं आहे आणि इतर रुग्णांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे, त्यांच्या प्रेरणा ठरल्या आहेत.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार या महिलेनं आपली प्रकृती बरी असल्याचं सांगितलं. मात्र छोट्या छोट्या वेदना अद्यापही कायम आहे. आपल्या या आजाराशी लढण्याचं बळ देणारे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे तिनं आभार मानलेत.

याआधी स्पेनमधील 106 वर्षांची महिला कोरोनाव्हायरसमधून बरी झाली होती.

हे वाचा - हा VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी; 3 वर्षाच्या लेकराला घरी ठेवून लढतेय वीरांगना

जगभरात कोरोनाव्हायरसचे 4,275,588 रुग्ण आहेत, तर 287,670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिकेनंतर स्पेनचा क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनमध्ये कोरोनाचे 2,68,143 रुग्ण आहेत, 26,744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संपादन - प्रिया लाड

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Spain