मुंबई, 12 मे : महाराष्ट्र सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यात वेगवेगळ्या कारागृहात असणाऱ्या तब्बल 17000 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास एकूण कैद्यांच्या निम्मी आहे. Coronavirus च्या पार्श्वभूमीवर तुरुंगामध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने कैद्यांची संख्या कमी करणं आवश्यक आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. मुंबईतल्या सर्वात मोठ्या आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासन हादरलं होतं. त्यानंतर भायखळ्याच्या तुरुंगातही एक महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळली.
मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात दोन दिवसांपूर्वी 77 कैद्यांसह 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. तुरुंगात बाहेरील नागरिकांना प्रवेश नाही. अशा परिस्थितीत येथील इतक्या कैद्यांना कोरोनाची लागण कशी झाली, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. यावर अनिल देशमुख म्हणाले की, भाजी किंवा दूध पोहोचविणाऱ्यांकडून तुरुंगात कोरोनाचा संसर्ग झाल्याची प्रकरणं समोर आली.
वाचा -कोरोनाच्या संकटात AC Train चा प्रवास सुरक्षित आहे का?
कारागृहात सोशल डिस्टन्सिंग पाळता यावं यासाठी काय करायला लागेल याचा अभ्यास करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमण्यात आली होती. त्यांनी किमान 17000 कैद्यांची तात्पुरत्या जामिनावर किंवा पॅरोलवर सुटका करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.
Committee formed to give recommendations to decongest Maharashtra jails has recommended that around 17,000 inmates in jails can be released on interim bails. This doesn't include inmates who are accused/convicts in UAPA, MCOCA, PMLA or other stringent Acts: Maharashtra Home Min pic.twitter.com/9c65PGOLcL
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्पुरती सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये संघटित गुन्हेगारीची मोक्कासारखी कलमं असलेल्यांचा समावेश करता येणार नाही. UDPA, MCOCA, PMLA आणि इतर गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांना सोडण्यात येणार नाही.
VIDEO : 'आम्ही ड्युटी करतो तिथंच थुंकताय?' पोलिसाने त्याला रस्ता धुवायला लावला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.