जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? भाजपने पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? भाजपने पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? भाजपने पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

पंकजाताई शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 डिसेंबर : पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना भाजकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे भाजपशिवाय कुठेही जाण्याचा विचार करणार नाहीत. त्या पक्षातच आहेत. त्यामुळे पंकजाताई शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. काल पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर त्यांच्या भावना व्यक्त करत एक पोस्ट केली होती. त्यावरून त्या भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण पंकजा मुंडे या भाजपशिवाय कुठेही जाणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. संजय राऊत यांचा दावा काही तथ्य नाही, आमचे कोणी संपर्कात नाही - विनोद तावडे दरम्यान, पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांना विचारलं असता येत्या 12 डिसेंबरला ते सगळ्यांना समजेल. पण पंकजा मुंडेच काय तर राज्यातले अनेक नेते सेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही, आमचे कोणी संपर्कात नाही असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. तर पंकजा मुंडे नाराज नाहीत, ते भाजपा सोडणार नाहीत. विधान परिषदेत कोणतंही पद पंकजा मुंडे यांनी मागितलेले नाही असंही तावडे यांनी स्पष्ट केलं. इतर बातम्या - ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’; भाजपची सत्ता गेल्याने 15 आमदार करणार घरवापसी! फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून ‘BJP’ हटवलं रतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द काढला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे. खरंतर, पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. त्यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. इतर बातम्या - …तर हैदराबाद प्रकरणात ना बलात्कार झाला असता ना हत्या, धक्कादायक माहिती समोर Facbook, Twitter नंतर आता WhatsApp वरून दिलेत संकेत फेसबुक पोस्ट आणि ट्विटर प्रोफाइलमधील बदलानंतर त्यांनी व्हॉटसअॅपवर डीपी बदलला आहे. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा डीपी लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंकजा त्यांच्या मतदारसंघात शिव मंदिरात प्रार्थना करत असलेला फोटो लावला होता. तो फोटो काढल्यानं पंकजा मुंडे यांनी नेमकं ठरवलंय तरी काय असा प्रश्न कार्यकर्त्यांसह सर्वांनाच पडला आहे. मोठी बातमी - देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ पंकजा मुंडे शिवसेनेते प्रवेश करणार का? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या चर्चा आहेत. त्या सेनेत प्रवेश करणार का प्रश्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातले बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषद बोलत होते. यावेळी पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता येत्या 12 डिसेंबरला त्यांची भूमिका सगळ्यांना कळेल. पण फक्त पंकजाच काय तर राज्यातले अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इतर बातम्या - रोहित पवारांचं एक असंही रूप, फेसबुक पोस्टने केलं सगळ्यांना भावूक…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात