नाशिक, 28 जुलै : राज्यात सध्या कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज कोरोनाच्या रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर येत आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांत कोरोनोने हाहाकार माजवला आहे. अशात पावसाळा सुरू झाल्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण पावसाळा म्हटलं की साथीच्या आराजांचा मोठा धोका असतो. आधीच कोरोनाने थैमानं घातलं असताना आता नाशिकमध्ये डेंग्युचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
नाशिक शहरात डेंग्यूचे 11 रुग्ण सापडले आहे. ऐन पावसाळ्यात डेंग्यूच्या डास वाढले आणि त्यातून संसर्ग वेगाने पसरत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणांना कोरोना, डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचं मोठं आव्हान समोर असणार आहे. अशात नागरिकांनीदेखील आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी नाशिक शहरात स्वाईन फ्ल्यूचे 3976 तर डेंग्यूचे 1124 संशयीत रुग्ण होते. त्यामुळे आता कोरोनाच्या काळात आणखी या संसर्गाचाही आकडा वाढेल अशी भीती लोकांमध्ये आहे.
राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, सुटसुटीत करण्यासाठी करणार तब्बल 11 बदल
नाशिकमध्ये या वर्षी स्वाईन फ्ल्यूचे 328 तर डेंग्यूचे 84 संशयीत रुग्ण आहे. यात जुलै महिन्यात संशयीत रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे कोरोनासोबतच इतर संसर्गही थांबवण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान असणार आहे. यावर स्वच्छता आणि फवारणाची महत्त्वाची कामं हाती घेण्याची गरज आहे.
मुंबईत 1 कोटीचं घर 30 लाखांत मिळणार, ठाकरे सरकारने आखला मोठा प्लान
दरम्यान, पावसाळा आला म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीमुळे देशात हाहाकार माजला आहे. ही चिंतेची बाब आहे. खरंतर व्हायरल ताप येणं आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाहीये. म्हणूनच, कोरोना संसर्ग अधिक वेगानं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा येणार म्हटल्यामुळे यंदा लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.
वुहानमध्ये नेमकं काय घडलं होतं? चीनच्या प्रमुख डॉक्टरांचा सर्वात मोठा खुलासा
हवामानाचा परिणाम कोरोनावर होतो असं आतापर्यंतच्या कोणत्याही संशोधनात समोर आलेलं नाही. पावसाळा आला की कोरोनाचा धोका वाढणार आणि उन्हाळ्यात कोरोनाचा प्रवाभ कमी होणार अशा अनेक बातम्या समोर आल्या. पण तंस काही होताना दिसलं नाही.
पावसाचा कोरोना विषाणूवर काही परिणाम होत नाही. महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणू हा हवेत नाही ही बाब लक्षात घ्यायला हवी. जर तुम्हाला कोरोना टाळायचा असेल तर त्यावर एकच उपचार आहे आणि तो म्हणजे वारंवार हात धुण्याची सवय लावणं आणि स्वच्छतेकडे लक्ष देणं. आपलं आरोग्य नीट असणं हीच कोरोनाला संपवण्याची पहिली लस आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर घाबरण्यापेक्षा आरोग्याची नीट काळजी घ्या.