राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, सुटसुटीत करण्यासाठी करणार तब्बल 11 बदल

राज्यात लवकरच येणार नवा सातबारा, सुटसुटीत करण्यासाठी करणार तब्बल 11 बदल

सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन सातबारा तयार करण्यात येणार आहे.

  • Share this:

पुणे, 28 जुलै : जमिनिंच्या व्यवहारासाठी सातबारा खूप महत्त्वाचा आहे. पण जुन्या पद्धतीने असलेला सातबारा आता तुम्हाला नव्या आणि सुटसुटीत स्वरुपात मिळणार आहे. राज्य सरकार लवकरच साधा आणि सोपा असा सातबारा तयार करणार आहे. सध्या सगळे व्यवहार हे संगणकाच्या माध्यमातून होतात. त्यामुळे काळाची गरज लक्षात घेत नवीन सातबारा तयार करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासंबंधातील प्रस्ताव हा राज्य शासनाला पाठवण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल सादरीकरणदेखील करण्यात आलं आहे.

मुंबईत 1 कोटीचं घर 30 लाखांत मिळणार, ठाकरे सरकारने आखला मोठा प्लान

आता वापरात असलेला शासकीय भाषेतील सातबारा हा थोडा किचकट आहे. यातल्या नोंदी आणि भाषा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महसूल विभागाने या ब्रिटिशकालीन साताबाऱ्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती राज्य समन्वक आणि उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली आहे. यासंबंधी वृत्त लोकमतने छापलं आहे.

मोठी बातमी! देशात 5 जागांवर होणार कोरोना लशीचं शेवटचं ह्यूमन ट्रायल

रामदास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन साताबाऱ्यामध्ये वेगवेगळे असे तब्बल 11 बदल करण्याचं सुचवण्यात आलं आहे. यामध्ये पहिल्यांदाचा महाराष्ट्र शासनाचा लोगो, गावाचा बारकोड असे अतिशय महत्त्वाचे आणि सोपे बदल करण्यात येणार आहेत.

शास्त्रज्ञांना सर्वात मोठं यश, कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडली

दरम्यान, या सातबारामध्ये गाव नमुना 7 मध्ये गावाच्या नावासोबत LGD कोड दाखवण्यात येणार आहे. सातबारा 7 मध्ये खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्क करण्यासोबत नमूद केला जात होता. पण आता नवीन सातबारानुसार खातेदार/खातेदारांच्या नावा सोबतच नमूद केला जाईल अशी माहिती देण्यात आली. यामुळे साताबारा भरणं आणि माहिती सुटसुटीत दिसेल. नवीन सातबाऱ्यामध्ये लागवडी योग्य क्षेत्र, क्षेत्राचं एकक खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार आणि इतर माहितीत बदल करण्यात येणार आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 28, 2020, 9:06 AM IST

ताज्या बातम्या