जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत 1 कोटीचं घर 30 लाखांत मिळणार, ठाकरे सरकारने आखला मोठा प्लान

मुंबईत 1 कोटीचं घर 30 लाखांत मिळणार, ठाकरे सरकारने आखला मोठा प्लान

मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं हे अनेकांचा स्वप्न असतं. त्यासाठी ते मेहनत करुन पैसे जमा करतात. आणि आपलं स्वप्नांचं घर घेतात. मात्र या घरासाठी जमा केलेले पैसे गरीबांना रेशन भरण्यासाठी दिल्याचं कधी ऐकलंय का?

मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं हे अनेकांचा स्वप्न असतं. त्यासाठी ते मेहनत करुन पैसे जमा करतात. आणि आपलं स्वप्नांचं घर घेतात. मात्र या घरासाठी जमा केलेले पैसे गरीबांना रेशन भरण्यासाठी दिल्याचं कधी ऐकलंय का?

गोरेगावमध्ये तुम्हाला कमी पैशात घर मिळेल याची कोणी कल्पनादेखील केली नसेल अशी एक खास योजना मुंबईकरांसाठी आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 जुलै : आर्थिक राजधानी मुंबई स्वप्ननगरी आहे. इथं आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न आहे. पण गोरेगावमध्ये तुम्हाला कमी पैशात घर मिळेल याची कोणी कल्पनादेखील केली नसेल अशी एक खास योजना मुंबईकरांसाठी आली आहे. सध्या मुंबईत साध्या घरांची किंमती कोटींमध्ये पोहोचली असताना गोरेगाव सारख्या परिसरात मुंबईकरांना अवघ्या 30 लाखामध्ये घरं खरेदी करता येणार आहे. शहरात पहिल्यांदाच परवडणारी अशी गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तयार करण्यात आली आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या गृहनिर्माण योजनचं भूमिपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होऊ शकतं अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकार ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुढील बैठकीत या योजनेस मान्यता देण्यात येणार आहे. ही जागी खाजगी मालकीची आहे आणि तो इको सेन्सेटिव्ह झोन आहे. पण, मागील बैठकीत सर्व माहिती उपलब्ध नसल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आला होता असं नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सांगितलं आहे. मोठी बातमी! देशात 5 जागांवर होणार कोरोना लशीचं शेवटचं ह्यूमन ट्रायल मुंबईत सुरू होणारा हा गृहनिर्माण प्रकल्प सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा नागरिकांसाठी असणार असल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली आहे. यामध्ये 300 चौ. किमी घराची जागा असणार आहे. ज्यामध्ये विकासकाला त्याला विकसकास फ्लोर स्पेस इंडेक्सला 2.5 मध्ये परवाणगी दिली जाईल. तर यामध्ये 50% हिस्सा हा 1500 ईडब्ल्यूएस युनिटमध्ये प्रकल्पाला असेल तर उर्वरित रक्कम खुल्या बाजारात विक्रीसाठी असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर सरकारने परवाणगी दिली तर 50-50 अशी सार्वजनिक-खाजगी भागीदारी होऊ शकते. कारण ही जमिन खाजगी आहे. तर जागेचं क्षेत्रफळ हे 10 एकरपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. खाजगी डेव्हलपर हे कोणत्याही स्थानिक प्राधिकरणात भागीदारी करू शकतात. मुंबईमध्ये बीएमसी BMC, , एमएमआरडी एसआरए MMRD SRA किंवा म्हाडादेखील MHADA असू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात