ॲम्स्टरडॅम, 21 एप्रिल : क्रीडा हे असे क्षेत्र जे तुम्हाला तुमच्या उमेदीच्या काळात सर्वोत्तम स्थानी ठेवते, मात्र हा काळ निघून गेला की परिस्थिती वाईट होते. असाच प्रकार एका आर्टिस्टिक खेळाडूसोबत घडला. आर्टिस्टिक वर्ल्ड कप जिंकणाऱ्या या खेळाडूची एकेकाळी सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली होती. मात्र आता याच खेळाडूला पॉर्न स्टार व्हावे लागले आहे. ही खेळाडू आहे नेदरलँड्सची जिम्नॅस्ट व्हेरोना व्हॅन दे ल्यूर. व्हेरोनाने अगदी लहान वयातच आपल्या कलेच्या जोरावर शिखर गाठले. ती युरोपमधील सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टपैकी एक होती, पण अचानक तिच्या आयुष्यात असं काही घडलं की आता तिला पॉर्न क्षेत्रात जावे लागले. व्हेरोनाला तिच्या आई-वडिलांनी घराबाहेर काढल्यानंतर ती रस्त्यावर आली. पोट भरण्यासाठी काहीच दुसरे साधन नसल्यामुळे अखेर व्हेरोनाने पॉर्न स्टार होण्याचा निर्णय घेतला. व्हेरोना व्हॅन डी ल्यूरने (Verona van de Leur) वयाच्या 5व्या वर्षापासून जिम्नॅस्टिक शिकण्यास सुरुवात केली. मात्र वयाच्या 14व्या वर्षी ती प्रसिद्धीच्या झोतात आली. व्हेरोना व्हॅन डी ल्यूरनं ज्युनिअर युरोपियन चॅम्पियनमध्ये दोन पदके जिंकले. दोन वर्षांनंतर, तीनं आणखी पाच युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली. यानंतर, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये व्हेरोनाने आपला दबदबा निर्माण केला. तीने नेदरलँड्समध्ये तीन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी व्हेरोना डच स्पोर्ट्स वुमन ऑफ द इअर झाली.
वाचा- VIDEO : लॉकडाऊनला कंटाळून रस्त्यावर आली महिला, पोलीस येताच काढले कपडे आणि… पैशांअभावी घ्यावा लागला पॉर्न स्टार होण्याचा निर्णय इतक्या लहान वयात व्हेरोनाने खूप पैसे कमवले. तिच्या पैसे आई-वडिलांकडे होते. 2004च्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना ल्यूरने अचानक सराव करणे बंद केले. याचे कारण ठरले तिचे बाबा. व्हेरोनाला कळले होते की, तिनं कमवलेली बक्षिसांची रक्कम तिचे बाबा मौजमजेसाठी उडवत होते. त्यामुळे व्हेरोनानं आई-वडिलांकडे सर्व पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, तिनं घरच्यांवर केस केली. यानंतर व्हेरोना जिम्नॅस्टिक्समधून निवृत्त झाली. वेरोना व्हॅन डी लियूरने तिच्या पालकांविरूद्ध हा खटला जिंकला आणि कोर्टाने तिच्या वडिलांना 81 हजार पौंड व्हेरोनाला देण्यास सांगितले. वाचा- आयसोलेशनमध्ये अनोळखी लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवतायत कोरोना संशयित रुग्ण
रस्त्यावर काढले दिवस व्हेरोनाला आई-वडिलांनी घरातून बाहेर काढल्यानंतर ती रस्त्यावर आली. काही दिवस हॉटेलमध्ये राहिल्यानंतर मात्र तिचे पैसे संपले. व्होरोनाने एका मुलाखतीत सांगितले की तिनं 2 वर्षे कारमध्ये रात्र घालवल्या. त्याच वेळी, पोट भरण्यासाठी, त्याने शॉपिंग सुपरस्टोअरमध्ये चोरी केली. या वेळी, व्हेरोना व्हॅन डी लिऊरला देखील तुरुंगात जावे लागले कारण त्याने एका जोडप्यास ब्लॅकमेल केले होते आणि 1000 युरो मागितले होते. व्होरोना 72 दिवस तुरुंगात होती. वाचा- Sex मुळे कोरोनाव्हायरसचा धोका आहे का? काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं तुरुंगातून सुटल्यानंतर बनली पॉर्नस्टार व्हेरोना तुरूंगातून बाहेर आल्यानंतर तिला पॉर्न स्टार होण्याची ऑफर आली. जिम्नॅस्टिक्सपेक्षा जास्त पैसे असल्यामुळे लिऊरने ही ऑफर स्वीकारली. आता व्हेरोना व्हॅन डी लिऊर गेली 9 वर्षे पोर्न इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ती तिच्या पालकांना भेटलेली नाही.