Sex मुळे कोरोनाव्हायरसचा धोका आहे का? काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

Sex मुळे कोरोनाव्हायरसचा धोका आहे का? काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यामध्ये कोरोनाव्हायरसची (Coronavirus) सौम्य लक्षणंही असतील तरी तुम्हाच्या जोडीदाराला त्याची लागण होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळे सल्ले दिले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे सोशल डिस्टेंसिंग. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून 2 व्यक्तींमध्ये पुरेसं अंतर असायला हवं. मग अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे सेक्स सुरक्षित आहे का? सेक्समुळे कोरोनाव्हायरस पसरतो का?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज नाही. तरी शारीरिक संबंध ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यामध्ये कोरोनाव्हायरसची (Coronavirus) सौम्य लक्षणंही असतील तरी तुम्हाच्या जोडीदाराला त्याची लागण होऊ शकते. याबाबत बीबीसीने लंडनमधील डॉक्टर एलेक्स जॉर्ज यांच्याकडून माहिती घेतली.

डॉ. जॉर्ज यांनी सांगितलं की, "जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसह आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल आणि सारख्या परिस्थितीत असाल तर तुम्हाला काही बदल करण्याची गरज नाही. मात्र जर दोघांपैकी एकामध्येही कोरोनाची लक्षणं दिसली तर एकमेकांपासून दूर राहावं, दोघांमध्ये किमान 2 मीटर अंतर ठेवावं आणि स्वत:ला घरातच एका ठिकाणी आयसोलेट करून घ्यावं."

बायको-मुलांना कोरोना होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्याचे गॅरेज हेच घर

तर शक्यतो नव्या व्यक्तीसह शारीरिक संबंध बनवू नयेत. कारण यामुळे तुम्हाला कोरोनाचा धोका असू शकतो. काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, मात्र त्यांना व्हायरसची लागण झालेली असते.

डॉ. एलेक्स म्हणाले, "जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कीस केलं असेल किंवा संपर्कात आला असाल आणि त्यानंतर त्या व्यक्तीला व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं तर तात्काळ स्वत:ला आयसोलेट करून घ्या आणि काही लक्षणं दिसत आहेत का ते तपासा. लक्षणं दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्या."

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती परिचारिकेचा 250 किमीचा प्रवास

First published: April 5, 2020, 11:08 PM IST

ताज्या बातम्या