Home /News /news /

साखरपुडा झाला अन् अंगाला लागली हळद, लग्नाच्या एक दिवस आधी हुंडा घेऊन नवरदेव पळाला

साखरपुडा झाला अन् अंगाला लागली हळद, लग्नाच्या एक दिवस आधी हुंडा घेऊन नवरदेव पळाला

लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदीच्या दिवशी नवरदेवाने मुलीच्या घरी येण्यास नकार देत मुलगी पसंत नसल्याचं सांगत लग्न करण्यास नकार दिल्यानं खळबळ उडाली.

    कन्हैया खंडेलवाल, प्रतिनिधी हिंगोली, 05 मार्च : लग्नाचा मुहूर्त ठरला...हुंडा घेतला...साखरपुडाही झाला...  अन् लग्नाच्या एक दिवस अगोदर हळदीच्या दिवशी नवरदेवाने मुलीच्या घरी येण्यास नकार देत मुलगी पसंत नसल्याचं सांगत लग्न करण्यास नकार दिल्यानं खळबळ उडाली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ही घटना घडली आहे. हा घटनेमुळे लग्न घरात आनंदाचं वातावरण एका क्षणात भंग झालं आहे. सुकळी इथल्या मुलीचा विवाह कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी इथल्या संदीप पाचपुते या मुलासोबत ठरला होता. डिसेंबर 2019 मध्ये सोयरीक झाली.  यामध्ये एक लाख 75 हजार रुपये, पाच ग्रॅमची अंगठी, घड्याळ, कपडे ,संसारोपयोगी साहित्य देण्याचं ठरलं होतं. 20 डिसेंबर 2019 रोजी सुकळी थाटात साखरपुडा पार पडला. जवळपास 200 ते 300 लोकांना जेवू घातलं. ठरल्याप्रमाणे 175000 रुपये,  पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि अंगठी नवरदेवाला देण्यात आली. त्यानंतर कपडेही घेऊन देण्यात आले.पण मग असं काही झालं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा रंगच उडाला. हे वाचा - संबंधासाठी नकार दिल्याने तरुणाने केली हत्या, ती बहीण असल्याचं लक्षात येताच... 3 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वाजून 44 मिनिटाला लग्नाची तारीख ठरल्यानं पत्रिकाही वाटप करण्यात आल्या होत्या. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. त्र लग्नाच्या एक दिवस अगोदर 2 र्च रोजी हळदीच्या दिवशी नवरदेवाच्या वडीलानं नवरदेवाला मुलगी पसंत नाही तो लग्नास नकार देत असल्याचं सांगितलं. लग्नाची सर्व तयारी झाली असल्यानंतर वराकडील मंडळीकडून नकार येताच या फसवणुकीमुळं वधूकडील मंडळी हादरून गेली. हे वाचा - कोरोनामुळे प्रत्येकजण आहे हैराण, असा पसरतो शरीरात आणि घेतो रुग्णाचा जीव मुलगी पाहूनच सोयरीक जुळवण्यात आली होती. मात्र अचानकपणे नवरा आणि वराकंडील मंडळीनं एन हळदीच्या दिवशी सोयरीक मोडल्यानं नवरी मुलगी आणि तिच्या कुटुंबियांवर वीज कोसळली.  याप्रकरणी वराकडील मंडळींविरुद्ध कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी नवरदेव संदीप पाचपुते,वडील शिवप्रसाद पाचपुते आई उषाबाई पाचपुते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल होताच हे तिघेही पसार झाल्यांचं सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असून आरोपींना तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. नक्की कोणावर आणि कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्नच या घटनेमुळे उपस्थित राहतो. हे वाचा - सलमान खानचं आणखी एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत वाजलं, पुन्हा कारण ठरली कतरिना
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या