मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सलमान खानचं आणखी एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत वाजलं, पुन्हा कारण ठरली कतरिना

सलमान खानचं आणखी एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत वाजलं, पुन्हा कारण ठरली कतरिना

एकदा का मित्राच्या लिस्टमधून बाहेर पडला की सलमान त्याला परत कधीच माफ करत नाही. सलमानच्या याच यादीमध्ये असं एक नाव आहे जे सलमानला अजिबात आवडत नाही.

एकदा का मित्राच्या लिस्टमधून बाहेर पडला की सलमान त्याला परत कधीच माफ करत नाही. सलमानच्या याच यादीमध्ये असं एक नाव आहे जे सलमानला अजिबात आवडत नाही.

एकदा का मित्राच्या लिस्टमधून बाहेर पडला की सलमान त्याला परत कधीच माफ करत नाही. सलमानच्या याच यादीमध्ये असं एक नाव आहे जे सलमानला अजिबात आवडत नाही.

मुंबई, 05 मार्च : सलमान खान (Salman Khan) म्हटलं की चाहत्यांची रांग काही संपत नाही. बॉलिवूडमध्येसुद्धा सलमानचे चाहते आहेत पण असेही काही स्टार्स आहेत जे सलमान खानला अजिबात आवडत नाही. एकदा का मित्राच्या लिस्टमधून बाहेर पडला की सलमान त्याला परत कधीच माफ करत नाही. सलमानच्या याच यादीमध्ये असं एक नाव आहे जे सलमानला अजिबात आवडत नाही. हे नाव विक्की कौशलचं (Vicky Kaushal) . विकीचा गुन्हा इतकाच आहे की त्याने सलमानच्या खास मैत्रिणीशी म्हणजेच कतरिनाशी मैत्री केली.

काही दिवसांपूर्वी विकी कौशलने सलमानसमोर मस्तीमध्ये कतरिनावर त्याचं प्रेम उघड केलं होतं. त्यावेळी समोर बसलेला सलमान हसत हसत या सर्व गोष्टी पहात राहिला. विकी कौशल हा हिंदी सिनेमांतील स्टार अभिनेता आहे. जो आताच्या काळातील सुपरस्टार मानला जातो. पण गेल्या काही महिन्यांपासून विक्की कौशलच्या चित्रपटांबरोबरच कतरिनाबरोबरच्या त्याच्या मैत्रीच्या बातम्याही जोरदार चर्चेत आहेत.

हे वाचा - Alert! मुंबईतील कोरोना व्हायरसची 'ही' बातमी आहे अफवा

काही दिवसांत कतरिना आणि विक्की कौशल एकमेकांच्या इतके जवळ आले आहेत की या दोघांच्याही भेटीची बातमी येत असते. हे दोघेही एकत्र सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचले होते. दिवाळी पार्टीत दोघे मागे-पुढे पोहोचले, मग मित्राच्या ठिकाणी दोघांना एकत्र पाहिलं गेलं. खरंतर एकेकाळी सलमानची खास मैत्रिणी असणारी कतरिना जिला सलमानने त्याच्या चित्रपटांमधून करिअर करण्यासाठी मदत केली. कतरिना आणि सलमानच्या नात्याच्या अनेक चर्चा सुरू असतानाच तीच कतरिना पुन्हा एकदा विकीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे.

हे वाचा - कोरोनामुळे प्रत्येकजण आहे हैराण, असा पसरतो शरीरात आणि घेतो रुग्णाचा जीव

कतरिना आणि विक्कीच्या मैत्रीबद्दल सलमानची नाराजी आता करण जोहरचा आगामी फिल्म 'तख्त'च्या रिलीजवर भारी पडणार आहे. कारण विकी 'तख्त'मध्येही मोठी भूमिका साकारत आहे आणि पुढच्या वर्षी 24 डिसेंबरला रिलीज होणारा तख्त हा  सलमानच्या 'किक -2' समोर असणार आहे. त्यामुळे या निमित्ताने विक्की आणि सलमान पहिल्यांदाच समोरासमोर असणार आहेत.

हे वाचा - आज 'या' मुद्द्यांवरून भाजप आणि महाविकास आघडी एकमेकांना करणार चेकमेट

First published:

Tags: Katrina kaif, Salman khan, Vicky kaushal