संबंधासाठी नकार दिल्याने लिंगपिसाट तरुणाने केली हत्या, ती बहीण असल्याचं लक्षात येताच...

संबंधासाठी नकार दिल्याने लिंगपिसाट तरुणाने केली हत्या, ती बहीण असल्याचं लक्षात येताच...

बलात्कारासाठी नकार दिल्यानंतर आरोपी तरुणाने केलं धक्कादायक कृत्य

  • Share this:

आग्रा, 05 मार्च : बलात्कार आणि हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आग्रा इथल्या ताजनागरीमध्ये एका लिंगपिसाट भावाने तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण बहिणीने नकार दिल्यामुळे त्याने तिच्या गळ्यावर चाकू फिरवून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात हा सगळा प्रकार घडला. पण त्यानंतर जेव्हा डोळे उघडले तेव्हा पायाखालची जमिन सरकली होती.

भावावर तरुणीचा बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बलात्कारात अपयशी ठरल्यानंतर आरोपीने तिचा गळा कापला. राग शांत झाल्यानंतर लक्षात आलं की ही आपली बहीण आहे तोच तरुणाने स्वत:देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळ्यावर चाकूने वार करून आरोपी भावाने आयुष्य संपवण्याचं ठरवलं. ही घटना ताजगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा - कोरोनामुळे प्रत्येकजण आहे हैराण, असा पसरतो शरीरात आणि घेतो रुग्णाचा जीव

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाने बलात्काराचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी तरुणीने विरोध केला तेव्हा संतप्त आरोपीने तिची मान कापली. दरम्यान, तरुणीचा आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपीच्या लक्षात आलं की आपण बहिणीच्या गळ्यावर चाकू फिरवला. त्यानंतर घटनास्थळी शेजार्‍यांना पाहून आरोपीने स्वत: चा गळासुद्धा कापला. दरम्यान, पोलिसांनी शेजाऱ्यांच्या माहितीवरुन आरोपीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे.

हे वाचा - आज 'या' मुद्द्यांवरून भाजप आणि महाविकास आघाडी एकमेकांना करणार चेकमेट

या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलीस सध्या आरोपी आणि पीडितेची चौकशी करत असून पुढील तपास करण्यात येणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशात जर महिलांवर भावाकडूनच अत्याचार होत असतील तर देशात महिला कुठेही सुरक्षित नाही असंच म्हणावं लागेल.

हे वाचा - सलमान खानचं आणखी एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत वाजलं, पुन्हा कारण ठरली कतरिना

First published: March 5, 2020, 9:16 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading