जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / ...यावरुन कळतं आई काय असते! रोहित पवारांनी भावूक पोस्ट

...यावरुन कळतं आई काय असते! रोहित पवारांनी भावूक पोस्ट

...यावरुन कळतं आई काय असते! रोहित पवारांनी भावूक पोस्ट

रोहित पवार आज सकाळी थेट घरातील किचनमध्ये पोहोचले. त्यांनी आपल्या आईसाठी काही तरी खास करण्याचा बेत आखला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मे : आजचा दिवस हा आई आणि लेकराच्या नात्याचा खास असा मातृदिन अर्थात आंतरराष्ट्रीय #MothersDay. याच निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या आईबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मातृदिनानिमित्त रोहित पवार आज सकाळी थेट घरातील किचनमध्ये पोहोचले. त्यांनी आपल्या आईसाठी काही तरी खास करण्याचा बेत आखला होता. पण, याची सुरुवात त्यांनी चहापासून केली. पहिल्यांदाच चहा तयार केल्यामुळे तो कसा झाला असेल याची धास्ती रोहित पवारांना होती. रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की,‘दररोज आई आपल्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवते म्हणून आज मातृ दिनाच्या निमित्ताने आईच्या आवडीचं काहीतरी तयार करायचं ठरवलं. खाण्या-पिण्याबाबत आईची वेगळी अशी खास आवड नाही पण असेल ते आवडीने खायची सवय. पण तरीही थोडा विचार केला आणि सर्वांत सोपं म्हणून चहा बनवायला किचनमध्ये गेलो. पण तिथेही मला आईची मदत घ्यावीच लागली.’

‘आईसाठी नेहमी ज्या भांड्यात चहा तयार केला जातो. त्या आजीने दिलेल्या भांड्यात आल्याचा चहा तयार केला आणि भरलेला कप आईच्या हाती दिला. चहा चवीला साधारणच बनला होता पण ‘खूप सुंदर झाला’ असा आईचा प्रतिसाद होता.’ हेही वाचा - ‘चहा खरंच सुंदर झाला होता की, मुलाने बनवला म्हणून सुंदर लागला ते आईलाच माहीत. पण यावरुन कळतं आई काय असते ते!’ असं म्हणत रोहित यांनी आजच्या मातृदिनानिमित्त आपली भावना व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात