जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / बीडचा नादखुळा, शेतकऱ्याच्या पोराने अमेरिकेत रचला इतिहास, आपलाच मोडला रेकॉर्ड

बीडचा नादखुळा, शेतकऱ्याच्या पोराने अमेरिकेत रचला इतिहास, आपलाच मोडला रेकॉर्ड

शाळेत असताना वडिलांनी वीट भट्टीवर काम सुरू केल्याने, कुटुंबाला वीटभट्टीवर राहावे लागे. तेथून अविनाश धावतच शाळेत यायचा.

शाळेत असताना वडिलांनी वीट भट्टीवर काम सुरू केल्याने, कुटुंबाला वीटभट्टीवर राहावे लागे. तेथून अविनाश धावतच शाळेत यायचा.

शाळेत असताना वडिलांनी वीट भट्टीवर काम सुरू केल्याने, कुटुंबाला वीटभट्टीवर राहावे लागे. तेथून अविनाश धावतच शाळेत यायचा.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 08 मे :  बीडच्या (beed) गावखेड्यातील ऑलम्पिक धाव पट्टू अविनाश साबळे (Avinash Sable) यांनी पुन्हा एकदा अटकेपार झेंडा फडकवला आहे. 5 हजार मीटर शर्यतीत 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत, अमेरिकेत इतिहास रचला आहे. अविनाश साबळेंच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी तोफा वाजवून आनंद साजरा केला. तर माझ्या मुलाने बीड जिल्ह्याचं नाव केलं आम्हाला खूप आनंद वाटतोय. असं म्हणत धावपट्टू अविनाश साबळेंच्या वडिलांची प्रतिक्रिया दिली. जिद्द, चिकाटी अन सातत्य असेल तर शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो. असचं करून दाखवलंय बीडचा शेतकरी पुत्र असणाऱ्या, धावपट्टू अविनाश साबळे यांनी..अविनाश याचा जन्म शेतकरी अन् वीटभट्टी कामगार असणाऱ्या कुटुंबात झाला. आष्टी तालुक्यातील मांडवा या गावात जन्मलेल्या अविनाश याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असल्याने, वीटभट्टीवर काम करायचे. अविनाशचे प्राथमिक पर्यंतचे शिक्षण मांडवा गावातच झाले. शाळेत असताना वडिलांनी वीट भट्टीवर काम सुरू केल्याने, कुटुंबाला वीटभट्टीवर राहावे लागे. तेथून अविनाश धावतच शाळेत यायचा. ( संतापजनक, पोलीस कॉन्स्टेबलचा नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार ) नेमके हेच त्याच्या शिक्षकांनी हेरले आणि अविनाशला धावण्याच्या स्पर्धेत उतरवले आणि काम करत अविनाशने धमाल केली. तो ज्या स्पर्धेत उतरायचा, वाऱ्यासारखा धावायचा आणि पदक जिंकायचा. 2006 मध्ये त्याने केलेल्या धावण्याच्या कामगिरीने त्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा आणि ग्रामस्थांनी  सत्कार केला. तेथून पुढे अविनाशने मागे पाहिलेच नाही ते आजपर्यंत.. तर गतवर्षी 30 जुलै 2021 रोजी टोकियोत झालेल्या, 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत, अविनाश हिट 2 मध्ये सहभागी झाला होता. या हिटमध्ये त्याने आपले स्वतःचे 8.20.20 चे रेकॉर्ड मोडले. मात्र सातव्या क्रमवारीत आल्याने त्याची फायनलची संधी हुकली होती. तर आता पुन्हा अविनाशने, 5 हजार मीटर शर्यतीत बहाद्दुर प्रसादचा 30 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये, अविनाशने 13:25.65 वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत 12 वा क्रमांक मिळवला आहे. तर यामुळे आनंद व्यक्त करताना अविनाशचे वडील मुकुंद साबळे म्हणाले की, ‘अविनाश लहानपणापासूनच खूप मेहनती आणि खेळाडू वृत्तीचा आहे. त्याने अमेरिकेत सुवर्णपदक मिळवलंय. त्यामुळे त्याने आमचं नाव तर मोठं झालंचं आहे. त्याचबरोबर त्याने बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आहे. अशी प्रतिक्रिया अविनाशचे वडील मुकुंद साबळे यांनी दिली. तर यावेळी अविनाशच्या आईला शब्द फुटले नाहीत. ‘आमच्या गावातील अविनाश ऑलम्पिकमध्ये गेला. त्याने खूप मेहनत करत चिकाटीने यश मिळवलंय. आज त्याने अमेरिकेत नंबर मिळवलाय. त्यामुळे आम्हा गावकऱ्यांना खूप आनंद वाटतोय. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्तीने दिली. ( ‘उद्धव ठाकरे दम असेल तर लोकांमध्ये या’, नवनीत राणा आक्रमक, BMC निवडणुकीत उतरणार ) तर याविषयी गावच्या महिला सरपंच म्हणाल्या की, ‘अविनाश साबळे याने अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत 30 वर्षापूर्वीचे रेकॉर्ड मोडत इतिहास रचला आहे. त्यामुळं आम्ही तोफा वाजवून आनंद साजरा केलाय. अतिशय गरीब कुटुंबातून अविनाशने यश मिळवलंय. त्यामुळे आज आम्हा ग्रामस्थांनी आनंद साजरा केला आहे.’ दरम्यान, अविनाशने केलेल्या या कामगिरी ने मांडवा गावासह बीड जिल्ह्याचं नाव अमेरिकेत कोरलं गेलंय. त्यामुळे अविनाशच्या गावकाऱ्यांसह बीड जिल्ह्यातील नागरिकांतून एक प्रकारचा आनंद साजरा केला जात असून गावखेड्यातील शेतकरी पुत्र असणाऱ्या अविनाश साबळेंची चर्चा सध्या देशात सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात