अलीगढ, 8 मे : उत्तरप्रदेश राज्याच्या अलीगढ (Uttarpradeh Aligarh) येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. अतरौली भागातील एका गावात शुक्रवारी रात्री नातेवाईकांच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला यूपी पोलिसांच्या कॉन्स्टेबलने आपल्या वासनेची शिकार बनवले. (UP Police Constable Rape) विरोध केल्यावर आरोपीने पीडितेला मारहाणही केली. आरोपी बुलंदशहर जिल्ह्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असून पीडितेच्या वडिलांच्या आत्याचा पती आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीला अटक केली आहे.
काय आहे घटना -
पीडित अल्पवयीन मुलीचे अलीगढच्या कोतवालीच्या अतरौली भागातील एका गावात नातेवाईक आहेत. ती तिथे आपल्या नातेवाईंकासोबत आली होती. आरोपी पोलीस कॉन्स्टेबल धर्म सिंहपण याचा गावातील मूळ रहिवासी आहे. तो पण आपल्या गावी आला होता. तो पीडितेच्या वडिलांचा नातेवाईक आहे. शुक्रवारी रात्री आरोपी तिच्याजवळ आला आणि तिला घरी घेऊन जाण्याबाबत सांगू लागला. पीडितेच्या नातेवाईकांनी विश्वासात येऊन तिला त्याच्यासोबत पाठवून दिले. यानंतर आरोपी धर्मसिंह पीडितेला आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला.
यानंतर वाटेत एका रिकाम्या प्लॉटमध्ये त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडितेने त्याला विरोध केला तर त्याने तिला मारहाणही केली. पीडित तरुणी तिच्या नातेवाईकांकडे पोहोचली असता, तिने त्यांना सर्व प्रकार सांगितला. पीडितेचा हा प्रकार ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी अतरौली येथे आरोपीविरोधात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी चौकशी करत आरोपीला अटक केली. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला कोठडी सुनावली आहे. यानंतर बुलंदशहरच्या एसएसपी यांनी आरोपी कॉन्स्टेबल याला निलंबित केले आहे.
अतरौलीचे प्रांताधिकारी देवेंद्र कुमार यांचे म्हणणे आहे की, कासगंजहून कोतवाली अतरौली भागातील गावात आलेल्या एका अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांच्या नातेवाईंकावर आरोप केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.