ओडिसा : बालासोर इथे झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघातात 288 हून अधिक लोकांनी प्राण गमवले. 900 जण जखमी झाले आहेत. तीन एक्स्प्रेसच्या दुर्घटनेत कोणी आपलं मित्र गमावला तर कोणी आपला जीवलग तर कोणी आपला मुलगा किंवा मुलगी गमावली आहे. मन सुन्न करणारा हा गेल्या 20 वर्षांतला सर्वात भयंकर अपघात आहे. या अपघातानंतर एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. वडिलांनी आपल्या मुलाला शवागृहातून बाहेर काढलं आणि त्याला जीवदान दिलं आहे. खरं तर ही घटना एका चमत्कारापेक्षा कमी नाही. वडिलांनी आपल्या हट्टामुळे मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी जाऊन आपल्या मुलाचा शोध घेतला. तिथून आपल्या मुलाला बाहेर काढलं आणि जीवदान दिलं आहे. या वडिलांच्या जिद्दीला मानलं पाहिजे.
एका अहवालानुसार हावडा इथे एका दुकान चालवणारे हेलाराम दुर्घटनेआधी काही तास 24 वर्षांच्या बिस्वजीत मलिकला शालीमार स्टेशनवर सोडून गेले. जेव्हा त्यांना बालासोरा ट्रेन अपघाताबद्दल माहिती मिळाली तेव्हा अवस्थ झाले आणि त्यांचं मन त्यांना शांत बसू देईना. त्यांनी आपल्या मुलाला फोन केला. त्यावेळी मुलाने फोन तर उचलला मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला काहीच बोलता येत नव्हतं.
Odisha Train Accident : 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं अलर्ट; 288 प्रवाशांचा जीव घेणारा भयाण ओडिसा रेल्वे अपघात रोखता आला असता?गंभीर जखमी झाल्याने रक्तस्त्राव खूप झाला होता. त्यामुळे तो बेशुद्ध झाला, त्या एका फोनमुळे मोठा अनर्थ घडल्याचं हेलाराम मलिक यांच्या लक्षात आलं. त्यांनी रात्रभर गाडी चालवून तातडीनं घटनास्थळ गाठण्याचा निर्णय घेतला आणि तिथे पोहोचले. हावडाहून बालासोरा 230 किलोमीटर दूर आहे. मात्र तिथे कुठेच त्यांना मुलगा दिसेना त्यांनी चौकशी केली. मनात भीती असली तर आपला मुलगा जीवंत आहे हे त्यांचं मन त्यांना सांगत होतं. घड्याळाचा काटा पुढे सरकेल तशी भीती अजून वाढत होती. आपला मुलगा कुठे आहे याचा शोध घ्यायला त्यांनी सुरू केलं. त्यांना बहानागा हायस्कूलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तिथे मृतदेह ठेवण्यात आले होते. हेलाराम मलिक यांना आधी अधिकाऱ्यांनी तिथे सोडलं नाही. त्यानंतर तिथे असलेल्या एकाने मृतदेह ठेवलेल्या ठिकाणी एकाचा हात हलत असल्याचं सांगितलं. त्यांनंतर अधिकाऱ्यांनी हेलाराम यांना आत सोडलं आणि आपल्या मुलाची ओळख पटवून त्याला तिथून बाहेर काढलं.
Balasore Train Accident : मृत्यूतांडवातून बचावले पण गरिबीने रडवलं, 36 हजार खर्च करून घरी पोहोचले जखमी!बिस्वजित मलिकचा हात होता, जो अत्यंत जखमी अवस्थेत मृतदेहांमध्ये पडलेला होता. अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बालासोर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला काही इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कटक मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. तरीही त्यांनी मुलाला तिथे नेण्यास नकार दिला आणि बाँडवर सही करून त्याला कोलकात्याला आणले. सध्या त्याच्यावर रविवार-सोमवारी 2 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याच्या शरीरात अनेक फ्रॅक्चर आढळले आहेत, जे बरे होण्यासाठी बराच वेळ लागेल.