जाहिरात
मराठी बातम्या / देश / Odisha Train Accident : 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं अलर्ट; 288 प्रवाशांचा जीव घेणारा भयाण ओडिसा रेल्वे अपघात रोखता आला असता?

Odisha Train Accident : 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं अलर्ट; 288 प्रवाशांचा जीव घेणारा भयाण ओडिसा रेल्वे अपघात रोखता आला असता?

तर टाळता आला असता अपघात....

तर टाळता आला असता अपघात....

Coromandel Odisha express accident : या अपघातासाठी कोण जबाबदार?

  • -MIN READ Trending Desk Odisha
  • Last Updated :

    भुवनेश्वर, 6 जून : ओडिशामध्ये झालेल्या भयानक रेल्वे अपघाताने देशाला हादरवून सोडलं. या अपघातात 275 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर शेकडो जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास सुरू आहे. अशातच एका रेल्वे अधिकाऱ्याचं पत्र व्हायरल झालंय. त्याने तीन महिन्यांपूर्वीच मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली होती. सिग्नल सिस्टिमधील त्रुटीमुळे अपघात होऊ शकतात, असं त्यानी पत्रात म्हटलंय. हरिशंकर वर्मा नावाच्या ज्या अधिकाऱ्याने रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलंय ते उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ इथं तैनात आहेत. ते तीन वर्षांपासून दक्षिण पश्चिम रेल्वेत कार्यरत आहेत. तेव्हा ते प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन मॅनेजर होते. त्यांच्या पोस्टिंगच्या काळात दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये चुकीच्या मार्गावर ट्रेन गेल्याची प्रकरणं समोर आली होती. दोषींवर कडक कारवाईची मागणी रेल्वे अधिकारी हरिशंकर यांनी सांगितलेल्या त्रुटीचा इंटरलॉकिंगसाठी असलेल्या सिस्टिमला बायपास करून लोकेशन बॉक्सशी छेडछाड करण्याशी संबंध होता. याला तत्काळ थांबवण्याचं आवाहन त्यांनी पत्रातून रेल्वे बोर्डाला केलंय. जे काही घडलंय त्याकडे गांभीर्यानं पाहावं, यामध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पण पत्र देऊनही कारवाई झाली नाही. ट्रेन सुरू असताना बदलतो रूट सिस्टिमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. गाडी सुरू झाल्यानंतर डिस्पॅच रूट बदलतो. सिग्नलशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे काम नवख्या कर्मचाऱ्यांकडे असते, त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते, असंही ते म्हणाले. Odisha Train Accident: 7 मृतदेहांमध्ये अडकला धाकटा भाऊ, मोठा 2 दिवस ट्रेनमध्ये शोधत राहिला; मग घडला हा चमत्कार कसा झाला अपघात रेल्वेकडून सांगण्यात आलं की, ट्रेन नंबर 12481 कोरोमंडल एक्सप्रेस बहानगा बाजार स्टेशनच्या (शालिमार-मद्रास) मेन लाइनवरून जात असताना ती रुळावरून घसरली आणि अप लूप लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ट्रेन खूप स्पीडमध्ये होती, त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले आणि 3 डबे डाउन लाइनवर गेले. बहानगा बाजार स्टेशनवर या गाड्यांचा स्टॉप नाही. त्यामुळे दोन्ही स्पीडमध्ये होत्या. बहानगा बाजार स्टेशनवरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरल्यानंतर काही डबे मालगाडीला धडकले. दरम्यान, अपघाताच्या वेळी डाउन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबेही रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या धडकेत आले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे 171 किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे 166 किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार स्थानकावर हा अपघात झाला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात