कल्याण, 05 सप्टेंबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.या खड्ड्यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनीच पुढाकार घेऊन अभिनव आंदोलन केले आहे. कल्याण शीळ रोड,मलंग रोड,पत्रिपुलासह मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. वारंवार तक्रारी करून देखील पालिका प्रशासन लक्ष देत नाही. कल्याण-मलंग रोडवरील खड्ड्यांमुळे तीन जणांचा बळी गेला आहे तर अनेक अपघात झाले आहे. त्यानंतरही पालिकेचं दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थ यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने खड्डे भरण्यास सुरुवात केली. मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकची भीषण धडक, जागीच 7 जण ठार पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महापालिकेचा निषेध केला आहे. याबाबत पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी ‘खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे निधीची कमतरता नाही’, असे सांगितले आहे. कंगनाने दिली धमकी, प्रतिक्रिया विचारली तर गृहमंत्र्यांनी…! मात्र, जर निधी आहे तर खड्डे बुजवून नागरिकांना होणारा त्रास का कमी केला जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. तर यापुढे द्वारली येथील मलंग रोड चांगला केला नाही तर ग्रामस्थ उग्र आंदोनल करतील, असा इशारा कुणाल पाटील यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.