मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बांध्यावरून थेट बंदरावर, मंत्रिपदावर नाराज? अखेर दादा भुसेंनी केला खुलासा

बांध्यावरून थेट बंदरावर, मंत्रिपदावर नाराज? अखेर दादा भुसेंनी केला खुलासा

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिंदे गटातील बरेच मंत्री हे नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिंदे गटातील बरेच मंत्री हे नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिंदे गटातील बरेच मंत्री हे नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती

धुळे, 15 ऑगस्ट : शिंदे सरकारच्या (shinde government) मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि त्यानंतर अखेरीस स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला खातेवाटपही जाहीर झाला आहे. पण दुय्यम दर्जाची खाती मिळाल्यामुळे शिंदे गटामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. कॅबिनेट मंत्री दादा भुसे (dada bhuse) हे नाराज असल्याची माहिती समोर आली. पण, कृतीच्या कारणामुळे आपण स्वतःच मागणी करून कृषी मंत्री पदाऐवजी अन्य मंत्री पद घेतलं, असा खुलासाच दादा भुसे यांनी केली. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटात पहिल्या दिवसांपासून सामील झालेले दादा भुसे यांचा कॅबिनेटमध्ये सहभाग झाला. पण खातेवाटपामध्ये दादा भुसे यांना बंदर खाते देण्यात आले आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिंदे गटातील बरेच मंत्री हे नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अखेर दादा भुसेंनी यावर खुलासा केला. 'खातेवाटपाबाबत मी नाराज नाही. मागील सरकारच्या काळात मी कृषीमंत्री होतो. पण प्रवास करत असताना दगदग सहन होत नव्हती. त्यामुळे त्यावेळी सुद्धा खाते बदलून मिळावे अशी विनंती केली होती. आताही  प्रकृतीच्या कारणामुळे आपण स्वतःच मागणी करून कृषी मंत्री पदाऐवजी अन्य मंत्री पद घेतलं', असा खुलासा दादा भुसे यांनी केला. ('कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..'; मोदींच्या टीकेवर अजित पवारांचं उत्तर) 'प्रवासामध्ये दगदग सहन होत नसल्याने अन्य मंत्रिपद घेतले. जे मंत्रिपद मिळाले आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार' असल्याचं भुसे यांनी स्पष्ट केलं. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे निर्णय घेऊन ज्या जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबादारी देतील ती पार पाडणार आहे', असंही दादा भुसे म्हणाले. मी माझ्या खात्यावर नाराज नाही - दीपक केसरकर तर दुसरीकडे,  दीपक केसरकर यांनीही आपल्याला मिळालेल्या खात्यावर मी समाधानी, नाराज असल्याचं वृत्त खोटं असल्याचा खुलासा केला आहे. (मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाची भेट, मध्य रेल्वेवर धावणार आणखी 10 एसी लोकल!) 'माझं खातं आणि जे माझ्याकडे खातं आले तरी मी त्याच्यावर अत्यंत अभ्यास पूर्ण काम करतो. मराठवाड्या सारख्या ठिकाणी निजामांच्या काळातील शाळा आहेत.   त्यावर काम करणं गरजेचं आहे. शिक्षणाचा दर्जा तर राखलाच पाहिजे,  परंतु मुलांच्या शिक्षणाचा जागा असतात त्याठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी गेली १५ वर्ष राज्यात एक नंबर आहे.  महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात वारोवर पॉलीसी बदलू शकत नाहीत त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ शकतो. मी कुठेही नाराज नाही मी कुठल्याही खात्याचं काम करायला तयार आहे, असं केसरकर म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या