मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाची भेट, मध्य रेल्वेवर धावणार आणखी 10 एसी लोकल!

मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाची भेट, मध्य रेल्वेवर धावणार आणखी 10 एसी लोकल!

मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लाईनवर आता 10 एसी लोकल धावणार आहे. यामध्ये सीएसएमटी ते बदलापूर दरम्यान 4 एसी लोकल धावणार आहे

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 15 ऑगस्ट : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या दिमतीमध्ये आणखी एसी लोकलची भर पडणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रेल्वे खात्याने मध्य रेल्वे मार्गावर  (Central Railway) 10 नव्या एसी लोकल ( AC local trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सीएसएमटी स्थानकापासून ते बदलापूर स्थानकापर्यंत एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतल्या लोकल रेल्वेचा प्रवास हा घामाघूम करणारा असतो. जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे हा प्रवास मुंबईकरांना त्रासदायक ठरलाय. हा प्रवास थोडासा सुखद व्हावा यासाठी आता AC लोकल्स सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेनं मध्य रेल्वे मार्गावरही एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. एसी लोकल प्रवाशांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता आणखी 10 एसी लोकलची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ,

मध्य रेल्वे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.

मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लाईनवर आता 10 एसी लोकल धावणार आहे. यामध्ये सीएसएमटी ते बदलापूर दरम्यान 4 एसी लोकल धावणार आहे.  तर ठाणे-सीएसएमटी दरम्यान 4 आणि  कल्याण-सीएसएमटी स्टेशन दरम्यान 2 एसी लोकल धावणार आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

AC लोकल असाव्यात अशी मागणी मुंबईत गेली कित्येक वर्ष होत होती. त्यानंतर पाठपुराव्याला यश आलं आणि पश्चिम रेल्वेवर पहिले AC लोकल सुरू झाली. त्यानंतर  मध्य रेल्वेवरही AC लोकल सुरू करण्यात आली होती. अलीकडेच एसी लोकलचे भाडे कमी करण्यात आले आहे. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळेच आता मध्य रेल्वेवर आता आणखी 10 नव्या एसी लोकल धावणार आहे.

First published: