पुणे, 15 मे : आषाढी वारीबाबतचा निर्णय 30 तारखेनंतर घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे आषाडीचा सोहळा यंदा कसा पार पडणार यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. पण कोणत्याही निर्णयाशिवायच बैठक पार पडली. कोरोनाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. 30 मेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे पालकमंत्री आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांची पुण्यात एकत्रित बैठक घेणार असून यामध्ये वारीसंदर्भात निर्णय घेताला जाईल असं सांगण्यात आलं आहे. आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर हेदेखील बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. यंदा आषाढी वारी होणार की नाही? अशी संभ्रमावस्था सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमध्येही सायबर क्राईम सुरूच, आतापर्यंत झाली ‘एवढ्या’ गुन्ह्यांची नोंद अजित पवार, प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांच्या दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली खरी पण यातून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आषाढी वारी सोहळा कसा असावा, याबाबत चोपदारांनी प्रारूप आरखाडा तयार केला. हा आराखडा प्रशासनाकडे पाठवण्यात आला. हा आराखडा अंतिम मानून पालखी सोहळ्याचे स्वरूप ठरते की अन्य काही सूचना दिल्या जातात, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. या बैठकीला देहू ,आळंदी, सासवड आणि पंढरपूर मंदिर समितीचे प्रमुख आणि चोपदार उपस्थित होते. त्याचबरोबर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेतील अधिकारीही उपस्थित राहणार होते. दरम्यान, आषाढी वारीत सात संतांच्या प्रमुख मानल्या जाणाऱ्या मानाच्या सात पालख्यांसोबत लाखो वारकरी चालत पंढरपूरला पोहोचतात. याशिवाय राज्यभरातून 150 पालख्या पंढरपूरात दाखल होतात. लॉकडाऊनची भयकथा : चालत निघालेल्या मजुरांनी उच्चारलेले शब्द ऐकताच डोळे पाणावतील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुण्यातून, निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महारकांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून येतात. मात्र, कोरोनामुळे या पालखी सोहळ्यावर प्रश्नचिंन्ह उपस्थित झालं आहे. पालख्यांच्या मूळस्थान मुळात रेड झोन आहे. पुणे, पिंपरीचिंचवड, नाशिक, पैठण, मुक्ताईनगर रेडझोनमध्ये आहेत. एवढंच नाही तर सोलापूर जिल्हा देखील रेड झोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत आषाढी वारीला परवानगी दिल्यास कोरोना व्हायरस आणखी पसरण्याची भीती आहे. तर दुसरीकडे वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वारकरी संप्रदायानं घेतली ही भूमिका.. दरम्यान, कोरोनामुळे गुढीपाडवा, अक्षय तृतीयसारख्या सर्वात मोठा धार्मिक उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. त्यामुळे यंदा आषाडी वारीलाही कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटी देणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.