मुंबई, 15 मे : सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर अशा गुन्हेगार व समाजकंटक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासना बरोबर समन्वय साधून काम करीत आहे.
महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक ,फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैर प्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. या लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सायबरने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 384 गुन्ह्यांची (ज्यापैकी 16 N.C आहेत) नोंद 14 मे 2020पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण व वर्गीकरण खालील प्रमाणे
जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . त्यामुळे सदर जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 27 वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीनं कोरोना महामारीबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवणारे मेसेजेस विविध ग्रुपवर व्हाट्सअँपद्वारे शेअर केले होते, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.