मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /संजय राऊतांचा काय आहे जेलमधून निघण्याचा एक्झिट प्लॅन, दिल्लीत कुणाची घेतली भेट? सुनील राऊतांनी स्पष्ट सांगितलं

संजय राऊतांचा काय आहे जेलमधून निघण्याचा एक्झिट प्लॅन, दिल्लीत कुणाची घेतली भेट? सुनील राऊतांनी स्पष्ट सांगितलं

 'संजय राऊत गेल्यामुळे आवाज काही बंद होणार नाही, आणखी संजय राऊत तयार होतील'

'संजय राऊत गेल्यामुळे आवाज काही बंद होणार नाही, आणखी संजय राऊत तयार होतील'

'संजय राऊत गेल्यामुळे आवाज काही बंद होणार नाही, आणखी संजय राऊत तयार होतील'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ईडीने अटक केली असून सध्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. राऊत यांच्या सुटकेसाठी हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली होती. पण, आम्ही कोणाही जामीन अर्ज सुप्रीम कोर्टामध्ये करणार नाही, अशी माहिती सुनील राऊत (Shiv Sena MLA Sunil Raut ) यांनी दिली.

'संजय राऊत यांचा भाऊ सुनिल राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीमध्ये चर्चा झाल्यानंतर राऊत यानी थेट दिल्ली गाठली होती. संजय राऊत यांच्या प्रकरणाबाबत वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले असल्याचे सांगितले जात होते पण, सुनील राऊत यांनी हे वृत्त फेटाळले आहे.

'खासदार संजय राऊत यांचे घर दिल्लीमध्ये आहे. या घरामध्ये मागील दोन महिन्यांपासून कुणी राहत नाही. घरात कुणी नसल्यामुळे सचिवाला भेटायला आलो. त्याबाबतची परिस्थिती पाहण्यासाठी मी दिल्लीत आलो आहे. मी कुणाचीही राजकीय भेट घेतलेली नाहीस कुठल्याही वकिलांशी मी चर्चा केलेली नाही, संजय राऊत यांच्या जामिनाबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार नाही, असंही सुनील राऊत यांनी सांगितलं.

(Kolhapur Shiv Sena : कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, ‘या’ बंडखोर माजी आमदारांच्या स्वागत कमानीजवळ आल्यावर लावले गाणे, मग पुढे…)

'शुक्रवारी मी मातोश्रीवर गेलो होतो उद्धव ठाकरे हे माझे कुटुंब प्रमुख आहेत त्यांना मी कायम भेटत असतो. ते नेहमी मला फोन करत असतात. देशातला कुठलाही नामवंत वकील सांगेल की, संजय राऊत यांच्यावरच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असंही सुनील राऊत म्हणाले.

( VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य)

'सुप्रीम कोर्टामध्ये जामीन अर्ज केला नाही. सेशन्स कोर्टामध्ये अर्ज केला आहे. तिथे काय होते हे पाहू. शिवसेनेचा आवाज बंद करण्यासाठी, सेनेकडून कुणी बोलू नये या एकाच कारणासाठी संजय राऊत यांना अटक झाली आहे. बाकी त्या प्रकरणामध्ये काहीही नाही. संजय राऊत लवकरच बाहेर येतील, असा विश्वासही सुनील राऊत यांनी व्यक्त केला.

'संजय राऊत गेल्यामुळे आवाज काही बंद होणार नाही, आणखी संजय राऊत तयार होतील, भाजपच्या अन्यायाविरोधात सगळे जण लढत राहतील, असा विश्वासही सुनील राऊत यांनी व्यक्त केला.

First published:
top videos