कोल्हापूर, 10 सप्टेंबर : कोरोनामुळे मागची दोन वर्षे गणपती मिरवणुकांबरोबर विसर्जनावर अनेक बंधणे लावण्यात आली होती. दरम्यान राज्यात यंदा मात्र मोठ्या जल्लोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. (Kolhapur Shiv Sena) याचबरोबर पावसाने काही ठिकाणी हजेरी लावल्याने नागरिकांनी पावसातच आनंद साजरा केला. तर काही ठिकाणी किरकोळ वादावादीचेही प्रसंग घडले परंतु मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही. परंतु कोल्हापूर शहरात मात्र ठाकरे आणि शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आल्याचे दिसून आले.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तशी शहरात रंगत वाढू लागली आहे. दरम्यान काल झालेल्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापूर शिवसेना आणि क्षीरसागर यांच्यात जोरदार खंडाजंगी सुरु आहे.
हे ही वाचा : VIDEO: औरंगाबादेत विसर्जन मिरवणुकीतही शिंदे विरुद्ध ठाकरे गट; आरतीवरुन राजकीय नाट्य
यातच काल विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या मंडळाची मिरवणूक जात असताना राजेश क्षीरसागर यांच्या स्वागत कमानीजवळ इंगवले यांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला हे गाणे लावून नाचल्याने वातावरण काही काळ गरम झाले होते. यापार्श्वभुमीवर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मागच्या काही दिवसांपासून रविकिरण इंगवले आणि राजेश क्षीरसागर यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. अशातच मिरवणुकीवरून कोणताही राडा होऊ नये पोलिसांनी योग्य ती म्हणून काळजी घेतली.
मागच्या काही दिवसांपूर्वी पोस्टरवरून जोरदार राडा
शिवेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी होत क्षीरसागर यांनी गुवाहाटी गाठले. पण याच दरम्यान इंगवले आणि त्यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे. गेले महिनाभर त्यांच्यात वाद सुरू होता. आता मात्र या वादाने टोक गाठले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने रॅली काढली. या रॅलीत इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी पेठ येथील सेनेच्या विभागीय कार्यालयावर लावलेले त्यांचे पोस्टर इंगवले यांनी फाडून टाकले.
हे ही वाचा : गणपती विसर्जनावेळी मुंबईत भाजपच्या दोन गटात जोरदार राडा, पोलीस येताच…
याशिवाय क्षीरसागर यांच्यावर यांच्यावर अनेक आरोप केले. ते म्हणाले, पक्षाच्या नावावर जोगवा मागून क्षीरसागर यांनी प्रचंड माया कमविली. सेनेने त्यांना वैभव दिले. तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांनी कोल्हापुरात शिवालय नावाने टेंडर कार्यालय काढले आहे. हे शिवालय नव्हे तर वसुली केंद्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.